पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६
कलम २ :
व्याख्या :
या अधिनियमात, संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर, -
(अ) पोलीस दलाचा सदस्य याचा अर्थ, या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिनियमान्वये नियुक्त झालेली किंवा नांव नोंदलेली (दाखल झालेली) कोणतीही व्यक्ती, असा आहे;
(ब) पोलीस दल यांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रभार असलेल्या कोणत्याही दलाचा समावेश होतो;
(क) विहित याचा अर्थ, या अधिनियमान्वये केलेल्या नियमांद्वारे विहित, असा आहे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.