पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६
कलम ३ :
संघ बनविणे, भाषण स्वातंत्र्य, इत्यादींच्या हक्कांच्या बाबतीत निर्बंध :
(१) पोलीस दलातील कोणताही सदस्य, केंद्र सरकारची किंवा विहित प्राधिकरणाची सुस्पष्ट मंजुरी घेतल्याशिवाय, -
(अ) कोणत्याही श्रमिक संघाचा ट्रेड युनियनचा, कामगार संघाचा, राजकीय संघाचा किंवा श्रमिक संघाच्या, कामगार, संघाच्या किंवा राजकीय संघाच्या कोणत्याही वर्गाचा सदस्य होणार नाही किंवा कोणत्याही मार्गाने त्यांच्याशी सहयोगी होणार नाही; किंवा
(ब) ज्याचा तो सदस्य आहे, अशा दलाचा भाग म्हणून जिला मान्यता मिळाली आहे किंवा जी निव्वळ सामाजिक मनोरंजनात्मक किंवा धार्मिक स्वरूपाची नाही अशा अन्य कोणत्याही सोसायटीच्या, संस्थेच्या, संघाचा, किंवा संघटनेचा सदस्य होणार नाही किंवा कोणत्याही मार्गाने त्यांच्याशी सहयोगी होणार नाही; किंवा
(क) असा पत्रव्यवहार किंवा प्रसिद्धी, त्याच्या कर्तव्याचे सद्भावनापूर्वक पालन करताना केलेली असेल किंवा ते निव्वळ साहित्यिक, कलात्मक किंवा वैज्ञानिक स्वरूपाचे असेल किंवा विहित केलेल्या स्वरूपाचे असेल त्याखेरीज, वृत्तपत्राबरोबर पत्रव्यवहार करणार नाही किंवा कोणतेही पुस्तक, पत्र किंवा अन्य दस्तऐवज प्रसिद्ध करणार नाही.
स्पष्टीकरण : जर कोणतीही सोसायटी, संस्था, संघ किंवा संघटना या पोटकलमाच्या खंड (ब) अन्वये निव्वळ सामाजिक, मनोरंजनात्मक किंवा धार्मिक स्वरूपाची आहे किंवा कसे यासंबंधी कोणताही प्रश्न उदभवल्यावर, त्यावरील केंद्र सरकारचा निर्णय अंतिम असेल.
(२) पोलीस दलाचा कोणताही सदस्य, कोणत्याही राजकीय प्रयोजनासाठी किंवा विहित करण्यात येईल, अशा अन्य कोणत्याही प्रयोजनांसाठी कोणत्याही व्यक्तींच्या निकायांनी आयोजित केलेल्या कोणत्याही सभेत (बैठकीत) किंवा कोणत्याही निदर्शनामध्ये सहभागी होणार नाही, त्यात भाषण करणार नाही किंवा भाग घेणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.