पोलीस दल ( हक्कांवर निर्बंध ) अधिनियम १९६६
कलम ६ :
नियम करण्याचा अधिकार :
(१) केंद्र सरकार या अधिनियमाची प्रयोजन पार पाडण्यासाठी शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नियम करू शकेल.
(२) या कलमान्वये केलेला प्रत्येक नियम, तो केल्यानंतर शक्य तितक्या लवकर, संसदेच्या प्रत्येक सभागृहासमोर, त्याचे अधिवेशन चालू असताना, एका अधिवेशनात किंवा लागोपाठच्या दोन किंवा अधिक अधिवेशनात मिळून होणाऱ्या एकूण तीस दिवसांच्या कालावधीसाठी सत्रीसीन असताना, मांडण्यात येईल आणि जर ज्या अधिवेशनात ते अशा प्रकारे मांडण्यात आले होते ते अधिवेशन किंवा त्याच्या लागतनंतरचे अधिवेशन समाप्त होण्यापूर्वी, त्या नियमात कोणताही फेरबदल करण्यास दोन्ही सभागृहे सहमत झाली असतील किंवा नियम करण्यात येऊ नये म्हणून दोन्ही सभागृहे सहमत झाली असतील तर, त्यानंतर असे नियम अशा फेरबदल केलेल्या स्वरूपातच अंमलात येतील किंवा मुळीच अंमलात येणार नाही; तथापि अशा कोणत्याही फेरबदलामुळे किंवा विलोपनामुळे त्या नियमान्वये यापूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीच्या विधिग्राह्यतेस बाधा येणार नाही.
अनुसूची :
कलम २ आणि ५ पहा :
(१) मद्रास जिल्हा पोलीस अधिनियम, १८५९
(२) आंध्र प्रदेश (आंध्र क्षेत्र) जिल्हा पोलीस अधिनियम, १८५९ (१८५९ चा २४)
(३) पोलीस अधिनियम, १८६१ (१८६१ चा ५)
(४) कलकत्ता उपनगर पोलीस अधिनियम, १८६६ (१८६६ चा बंगाल अधिनियम २)
(५) कलकत्ता पोलीस अधिनियम, १८६६ (१८६६ चा बंगाल अधिनियम क्र. ४)
(६) बंगाल पोलीस अधिनियम, १८६९ (१८६९ चा बंगाल अधिनियम क्र. ७)
(७) पोलीस अधिनियम, १८८८ (१८८८ चा ३)
(८) मद्रास शहर पोलीस अधिनियम, १८८८ (१८८८ चा मद्रास अधिनियम क्र. ३)
(९) बंगाल मिलिटरी पोलीस अधिनियम, १८९२ (१८९२ चा ५)
(१०) आंध्र प्रदेश (तेलंगणा क्षेत्र) जिल्हापोलीस अधिनियम,
(११) १३२९ फसली (१३२९एफ चा १०)
(१२) पूर्वांचल रायफल (पश्चिम बंगाल बटालियन) अधिनियम, १९२० (१९२० चा बंगाल अधिनियम क्र. २)
(१३) पोलीस अधिनियम, १९८३ (ए. डी. १९२७) (१९८३ चा जम्मू व काश्मीर अधिनियम क्र. २)
(१४) हैदराबाद शहर पोलीस अधिनियम, १३४८ फसली (१३४८ एफ चा ९)
(१५) आसाम रायफल अधिनियम, १९४१ (१९४१ चा ५)
(१६) ओरिसा मिलिटरी पोलीस अधिनियम, १९४६ (१९४६ चा ओरिसा अधिनियम क्र. ७)
(१७) दिल्ली विशेष पोलीस आस्थापना अधिनियम, १९४६ (१९४६ चा २५)
(१८) उत्तर प्रदेश प्रादेशिक सशस्त्र शिपाई दल अधिनियम, १९४८ (१९४९ चा उ. प्र. अधिनियम ४०)
(१९) केंद्रीय राखीव पोलीस अधिनियम, १९४९ (१९४९ चा ६६)
(२०) राजस्थान सशस्त्र शिपाईदल अधिनियम, १९५० (१९५० चा राजस्थान अधिनियम १२)
(२१) मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ (१९५१ चा मुंबई अधिनियम २२)
(२२) मुंबई राज्य राखीव पोलीस बल अधिनियम, १९५१ (१९५१ चा मुंबई अधिनियम क्र. ३८)
(२३) केरळ पोलीस अधिनियम, १९६० (१९६१ चा केरळ अधिनियम क्र. ५)
(२४) म्हैसूर पोलीस अधिनियम, १९६३ (१९६४ चा म्हैसूर अधिनियम क्र. १)
(२५) नागालँड सशस्त्र पोलीस अधिनियम, १९६६ (१९६६ चा नागालँड अधिनियम क्र. ६).
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.