अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६
कलम २२-कक :
केंद्र सरकारचा विशेष न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार :
(१) या अधिनियमाखालील आणि एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये केलेल्या अपराधांची त्वरित संपरीक्षा करण्याच्या प्रयोजनार्थ, तसे करणे आवश्यक आहे याबाबत केंद्र सरकारची खात्री पटल्यास ते राजपत्रातील अधिसूचनेद्वारे आणि उच्च न्यायालयाशी विचारविनिमय केल्यानंतर, अशा अपराधांच्या संपरीक्षेसाठी प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याची किंवा महानगर दंडाधिकाऱ्याची एक किंवा अधिक न्यायालये स्थापन करू शकेल.
(२) कलम २२-१ च्या तरतुदी शक्य होईल तेथवर पोटकलम (१) अन्वये स्थापन केलेल्या न्यायालयाला त्या जशा या कलमान्वये स्थापन केलेल्या न्यायालयांना लागू होतात तशाच लागू होतील.
The Immoral Traffic ( Prevention ) Act 1956 in Marathi section 22AA.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.