लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ४२
१.पर्यायी शिक्षा :
जेव्हा एखादी कृती किंवा अकृती ही या अधिनियमान्वये आणि तसेच भारतीय दंडसंहितेची कलमे १६६ अ, ३५४अ, ३५४ब, ३५४क, ३५४ड, ३७०, ३७०अ, ३७५, ३७६, २.(कलम ३७६ अ, कलम ३७६ अब, कलम ३७६ ब,कलम ३७६ क, कलम ३७६ ड, कलम ३७६ डअ, कलम ३७६ डब), ३७६ई किंवा कलम ५०९ याअन्वये शिक्षापात्र अपराध असेल तर, त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असले तरी, अशा अपराधासाठी दोषी असल्याचे आढळून आलेला अपराधी, या अधिनियमात तो ज्या शिक्षेस पात्र असेल किंवा भारतीय दंडसंहितेअन्वये ज्या शिक्षेची तरतूद असेल त्यापैकी ज्या शिक्षेची डिग्री मोठी असेल अशा शिक्षेस पात्र असेल.
-------
१. सन २०१३ चा फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम याच्या कलम २९ अन्वये मूळ कलम ४२ ऐवजी घातला.
२.फौजदारी कायदा (सुधारणा) अधिनियम, २०१८ (क्र.२२ सन २०१८) कलम २५ द्वारे सुधारित.(भारताचे राजपत्र, असाधारण, भाग-२, खंड १, दिनांक ११-८-२०१८ रोजी इंग्रजीत प्रकाशित.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.