लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२
कलम ४४
अधिनियमाच्या अंमलबजावणीचे संनियंत्रण : -
१) बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ (२००६ चा ४) याच्या कलम ३ अन्वये घटित केलेला राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग किंवा यथास्थिती कलम १७ अन्वये घटित केलेला राज्य बालहक्क संरक्षण आयोग हा त्या अधिनियमान्वये त्यांना नेमून दिलेल्या कार्यांबरोबरच विहित करण्यात येईल अशा रीतीने या अधिनियमाच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्याबाबत संनियंत्रणदेखील करील.
२) पोटकलम १) मध्ये निर्देश केलेल्या राष्ट्रीय आयोगाला किंवा यथास्थिती राज्य आयोगाला या अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाच्या संबंधात कोणत्याही बाबीमध्ये चौकशी करताना बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम, २००५ (२००६ चा ४) अन्वये त्या आयोगांकडे जे अधिकार विहित करण्यात आलेले असतील तेच अधिकार असतील.
३) पोट-कलम १) मध्ये निर्देश केलेला राष्ट्रीय आयोग किंवा यथास्थिती राज्य आयोग हा बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम २००५ चा ४) याच्या कलम १६ मध्ये निर्देश केलेल्या वार्षिक अहवालात या कलमाखालील त्याच्या कार्यांचादेखील
समावेश करील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.