नियम ३ दुभाषी, अनुवादक व विशेष शिक्षक :
लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२
नियम ३
दुभाषी, अनुवादक व विशेष शिक्षक :
१) प्रत्येक जिल्ह्यात, जिल्हा बाल संरक्षण केंद्र हे, अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी दुभाषी, अनुवादक व विशेष
प्रशिक्षक यांची नावे, पत्ते व संपर्काचे इतर तपशील असलेली एक नोंदवही ठेवली आणि बालकांसंबंधातील विशेष पोलीस युनिट (यात यापुढे ज्याचा निर्देश बाविपोयु असा करण्यात आला आहे). स्थानिक पोलीस, न्यायदंडाधिकारी किंवा विशेष न्यायालय यांना आवश्यकता असेल तेव्हा ही नोंदवही उपलब्ध करून देण्यात येईल.
२) अधिनियमाचे कलम १९ चे पोटकलम ४), कलम २६ ची पोटकलमे ३) व ४) आणि कलम ३८ यांच्या प्रयोजनांसशंी नेमलेले दुभाषी, अनुवादक विशेष प्रशिक्षणक व तज्ज्ञ यांची अर्हता व अनुभव या नियमांमध्ये निर्देशित करण्यात
आल्याप्रमाणे असेल.
३) जेथे जिल्हा बाल संरक्षण केंद्राने पोट-नियम १) खाली ठेवलेल्या सूची (मध्ये असलेल्या) व्यतिरिक्त अन्य दुभाषी, अनुवादक किंवा विशेष प्रशिक्षक नेमलेले असतील तेथे, जिल्हा बाल संरक्षर केंद्र, विशेष न्यायालय किंवा इतर संबंधित प्राधिकरण यांची खातरजमा होण्यास अधीन राहून, दुभाषी, अनुवादक किंवा विशेष प्रशिक्षक यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव किंवा औपचारिक शिक्षण किंवा प्रशिक्षण किंवा संबंधित भाषांच्या अस्खलितपणाविषयी प्रात्यक्षिक करून दाखविलेला पुरावा यावरून या नियमाच्या पोट-नियम ४) व ५) मध्ये विहित केलेल्या अटी शिथिल करण्यात येतील.
४) पोट-नियम १) अन्वये नेमलेले दुभाषी व अनुवादक यांना, बालकाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेचा तसेच राज्याच्या राजभाषेचा एकतर अशी भाषा ही त्यांची मातृभाषा असल्या
मुळे किंवा किमान प्राथमिक शाळेच्या स्तरापर्यंत शाळेतील शिक्षणाचे माध्यम असल्यामुळे किंवा दुभाषी किंवा अनुवादकाने जेथे ती भाषा बोलली जाते त्या क्षेत्रात त्याचा धंदा, व्यवसाय किंवा निवासस्थान असल्यामुळे अशा भाषेचे ज्ञान संपादन केले असेल यादृष्टीने व्यावहारिक परिचय असला पाहिजे.
५) पोट-नियम १) अन्वये नोंदवहीत नोंद केलेले सांकेतिक भाषेचे दुभाषी, विशेष प्रशिक्षक व तज्ज्ञ यांच्याकडे सांकेतिक भाषेतील किंवा विशेष शिक्षणामध्यील किंवा तज्ज्ञ व्यक्तींच्या बाबतीत, मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अथवा भारतीय पुनर्वसन परिषदेची मान्यता असलेल्या संस्थेच्या संबंधित विद्याशाखेतील प्रस्तुत अर्हता असली पाहिजे.
६) ज्यांच्या नावाची पोटनियम १) अन्वये किंवा अन्यता ठेवलेल्या नोंदवहीत नावनोंदणी केलेली असेल असा दुभाषी, अनुवादक, विशेष प्रशिक्षक किंवा तज्ज्ञ व्यक्ती यांच्या सेवांबद्दलचे प्रदान हे, राज्य शासनाकडून बाल न्याय अधिनियम, २००० च्या कलम ६१ अन्वये ठेवलेल्या निधीतून किंवा जिल्हा बाल संरक्षण केंद्राच्या विनियोगासाठी ठेवलेल्या इतर कोणत्याही निधीतून, त्यांना ठरविलेल्या दराने आणि राज्य शासनाकडून याबाबतीत विदित करण्यात येईल अशा नमुन्यात मागणी प्राप्त झाल्यावर देण्यात येईल.
७) दुभाषी, अनुवादक, विशेष शिक्षक किंवा तज्ज्ञ व्यक्ती ही स्त्री अथवा पुरूष असावी याविषयी अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम १) अन्वये माहिती प्राप्त झाल्यानंतर, बालकाने कोणत्याही टप्प्यावर व्यक्त केलेला कोणताही पसंतीक्रम विचारत घेता येईल, आणि बालकाशी संवाद साधने शक्य व्हावे म्हणून, आवश्यकता असेल तेथे अशा एकापेक्षा अधिक व्यक्ती नेमता येतील.
८) अधिनियमाच्या प्रयोजनासाठी सेवा पुरविण्यासाठी नेमलेल्या दुभाषी, अनुवादक, विशेष शिक्षण किंवा बालकाच्या संवाद साधण्याच्या रीतीशी परिचय असलेली व्यक्ती ही पूर्वग्रहरहित व नि:पक्षपाती असेल आणि ती हितविरोधी अशी कोणतीही सत्य किंवा आकलन झालेली माहिती उघड करील ती व्यक्ती फौजदाी प्रक्रिया संहिता १९७३ याच्या कलम २८२ अनुसार, कोणतीही भर घालता किंवा कोणतीही बाब न वगळता संर्पूण व अर्थउकल आणि अनुवाद करील.
९) कलम ३८ खालील कार्यवाहीमध्ये विशेष न्यायालय हे, बालकाला न्यायालयाची भाषा समुचित रीतीने बोलता येते किंवा कसे आणि बालकाशी संवाद साधणे शक्य व्हावे म्हणून ज्यांची नेमणूक केलेली आहे असे कोणतेही दुभाषी, अनुवादक, विशेष शिक्षक, तज्ज्ञ किंवा बालकाशी संवाद साधण्याच्या हितविरोधी बाबीचा अंतर्भाव असणार नाही, याची खातरजमा करील.
१०) अधिनियमाच्या किंवा त्याखालील नियमांच्या तरतुदींन्वये नियुक्त केलेला कोणताही दुभाषी, अनुवादक, विशेष शिक्षण किंवा तज्ज्ञ व्यक्ती भारतीय साक्षीपुरावा अधिनियम, १८७२ चे कलम १२७ तसेच कलम १२६ यामध्ये वर्णन केलेल्या गोपीनयतेच्या नियमांना बांधील असतील.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
No feedback yet
Form is loading...