लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण नियम २०१२
नियम ५
आपत्कालीन वैद्यकीय उपचार :
१) जेथे बालकांसंबंधातील विशेष पोलीस पथकाच्या किंवा स्थानिक पोलीस अधिकाऱ्याला अधिनियमाच्या कलम १९ अन्वये माहिती प्राप्त झाली असेल की, अधिनियमाखालील अपराध करण्यात आलेला आहे आणि ज्याच्याविरूद्ध अपराध करण्यात आला असेल त्या बालकाला तात्काळ वैद्यकीय उपचाराची व संरक्षणाची गरज आहे अशी खात्री पटली असेल तेथे तो शक्य तितक्या लवकर परंतु अशी माहिती मिळाल्यापासून २४ तासांपेक्षा उशीरा नसेल एवढ्य कालावधीत अशा बालकाला आपत्कालीन वैद्यकीय उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात किंवा वैद्यकीय उपचार केंद्रात नेण्याची व्यवस्था करील.
परंतु असे की, अधिनियमाची कलमे, ३,५,७ किंवा ९ या खालील अपराध करण्यात आला असेल तेथे बळी पडलेल्या बालकाला आपत्कालीन वैद्यकीय उपचारासाठी पाठविण्यात येईल.
२) आपत्कालीन वैद्यकीय उपचार हे बालकाची गोपनीयता जपली जाईल अशा रीतीने आणि मातापिता किंवा पालक किंवा बालक ज्याच्यावर विश्वास ठेवते व त्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो अशा अन्य कोणत्याही व्यक्तीच्या उपस्थितीत करण्यात येतील.
३) कोणताही वैद्यकीय व्यवसायी, रूग्णालय किंवा इतर वैद्यकीय उपचार केंद्र हे बालकावर आपत्कालीन उपचार करताना असा उपचार करण्यासाठीची पूर्वअट म्हणून कोणत्याही कायदेशीर किंवा दंडाधिकारविषयक आदेशाची किंवा इतर दस्तऐवजाची मागणी करणार नाही.
४) नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायी, आपत्कालीन वैद्यकीय उपचार करताना पुढील बाबींसह बालकाच्या गरजांकडे लक्ष देईल.
एक) जननेंद्रियासंबंधीच्या इजा असल्यास त्यांसहित, धाव, जखमा व इतर इजा यांवर उपचार;
दोन) आढळून आलेल्या लैंगिक संक्रमित रोगांच्या रोगप्रतिबंधक उपचारांसह लैंगिक संक्रमित रोगाचे निदान करण्यासाठी उपचार;
तीन) संक्रामक रोगांच्या तज्ज्ञांबरोबर आवश्यक ती सल्लामसलत केल्यानंतर एचआयव्हीच्या रोगप्रतिबंधक उपचारांसह एचआयव्हीचे निदान करण्यासाठी उपचार;
चार) गर्भधारणेची शक्यता व संतती प्रतिबंधक साधने याबाबत पौगंडाशवस्थेतील बालक व त्याचे मातापिता किंवा बालक ज्याच्यावर विश्वास ठेवते व त्याला ज्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटतो अशा इतर कोणत्याही व्यक्तीबरोबर चर्चा आणि
पाच) जेथे आवश्यकता असेल तेथे मानसिक किंवा
मानसशास्त्रीय आरोग्याबाबत संदर्भ किंवा सल्लामसलत किंवा अन्य प्रकारे समुपदेशन करण्यात यावे.
५) आपत्कालीन वैद्यकीय उपचार करण्याच्या ओघात गोळा केलेला न्यायसाहाय्यक विज्ञान प्रयोगशाळेचा कोणत्याही पुरावा हा अधिनियमाच्या कलम २७ अनुसार गोळा करण्यात यावा.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.