रेल्वे अधिनियम, १९८९
प्रकरण १२ :
अपघात :
कलम ११३ :
रेल्वे अपघाताची सूचना :
१) एखाद्या रेल्वेच्या चालनाच्या ओघात, -
क) ज्यामध्ये मानवी जीवितहानी झाली आहे किंवा भारतीय दंड संहितेमध्ये व्याख्या केल्याप्रमाणे जबर दुखापत झाली आहे किंवा विहित करण्यात येईल अशी, संपत्तीला जबर हानी पोचली आहे असा कोणताही अपघात; किंवा
ख) ज्यापैकी एक गाडी उतारुंचे वहन करणारी असेल अशा कोणत्याही गाड्यांची टक्कर; किंवा
ग) उतारुंचे वहन करणारी कोणतीही गाडी किंवा अशा गाडीचा कोणताही भाग रुळावरुन घसरणे; किंवा
घ) सामान्यत: उपरोक्तप्रमाणे, मानवी जीवितहानी किंवा जबर दुखापत करणारा किंवा संपत्तीला जबर क्षती पोचवणारा अशा वर्णनाचा कोणताही अपघात; किवा
ङ) केंद्र शासन या बाबतीत, शासकीय राजपत्रात अधिसूचित करील अशा इतर कोणत्याही वर्णनाचा कोणताही अपघात, घडला असेल अशा बाबतीत, जेते अपघात घडला असेल त्या ठिकाणापासून सर्वात जवळ असलेला स्टेशन मास्तर किंवा, जेथे स्टेशन-मास्तर नसेल तेथे ज्या रेल्वेवर अपघात घडला असेल त्या रेल्वेचा त्या भागाचा प्रभारी रेल्वे कर्मचारी, विलंब न लावता, ज्याच्य अधिकारीक्षेत्रात अपघात घडला असेल त्या जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्याला अणि पोलीस अधीक्षकाला आणि ज्याच्या स्थानिक सीमांमध्ये तो अपघात घडला असेल त्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला किवा केंद्र शासन या बाबतीत नियुक्त करील अशा अन्य दंडाधिकाऱ्याला आणि पोलीस अधिकाऱ्याला अशा अपघाताची सूचना देईल.
२) ज्याच्या अधिकारक्षेत्रात अपघात घडला असेल ते रेल्वे प्रशासन आणि अपघातात सापडलेली गाडी ज्याच्या मालकीची आहे ते रेल्वे प्रशासन सुद्धा विलंब न लावता राज्य शासनाला आणि अपघाताच्या ठिकारी ज्याचे अधिकारक्षेत्र आहे त्या आयुक्ताला अपघातांची सूचना देईल.
#Railway #Act 1989 #Marathi Section 113
Section 113 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.