रेल्वे अधिनियम, १९८९
कलम १४५ :
दारुची धुंदी किंवा उपद्रव :
जर एखादी व्यक्ती रेल्वेच्या कोणत्याही डब्यात किंवा रेल्वेच्या कोणत्याही भागात, -
क) नशा चढलेल्या अवस्थेत असेल; किंवा
ख) कोणताही उपद्रव देईल किंवा असभ्यपणाची कृती करील; किंवा शिवराळ व अश्लील भाषा वापरील; किंवा
ग) रेल्वे प्रशासनाकडून पुरविण्यात आलेल्या कोणत्याही आरामदायी सुविधामध्ये, कोणत्याही प्रवाशाच्या आरामशीर प्रवासावर परिणाम होईल अशा रीतीने हेतुपुरस्सर किंवा कारणाशिवाय हस्तक्षेप करील,
तिला कोणत्याही रेल्वे कर्मचाऱ्याकडून रेल्वेमधून काढून लावले जाऊ शकेल आणि तिचा पास किंवा तिकीट जप्त केले जाईलच पण त्याशिवाय सहा महिन्यांपर्यंत असू शकेल अशा कारावासाच्या आणि पाचशे रुपयांपर्यंत असू शकेल अशा द्रव्यदंहाच्या शिक्षेसही ती पात्र होईल :
परंतु असे की, न्यायालयाच्या न्यायनिर्र्णयामध्ये नमूद करावयाच्या तद्विरुद्ध विशेष व पर्याप्त कारणांच्या अभावी अशी शिक्षा, -
क) पहिल्या अपराधाच्या दोषसिद्धिच्या बाबतीत, शंभर रुपये द्रव्यदंड; आणि
ख) दुसऱ्या किंवा नंतरच्या अपराधाच्या दोषसिद्धिच्या बाबतीत, एक महिन्याचा कारावास व दोनशे पन्नास रुपये द्रव्यदंड, यापेक्षा कमी असणार नाही.
#Railway #Act 1989 #Marathi Section 145
Section 145 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.