रेल्वे अधिनियम, १९८९
कलम १६९ :
बिनसरकारी रेल्वेवर शास्तीची आकारणी :
जर कोणत्याही बिनसरकारी रेल्वेने, या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधान्वये केंद्र शासनाकडून आलेल्या कोणत्याही मागणीचे अथवा देण्यात आलेल्या निर्णयाचे किंवा आदेशाचे अनुपालन करण्यात कसूर केली अथवा या अधिनियमाच्या कोणत्याही उपबंधाचे अथवा व्यतिक्रमण केले तर, केंद्र शासन आदेशाद्वारे, दोनशे पन्नास रुपयांपेक्षा अधिक असणार नाही इतकी शास्ती अथवा असे व्यतिक्रमण जितके दिवस चालू राहील त्या प्रत्येक दिवसासाठी दीडशे रुपयांपेक्षा अधिक असणार नाही अशी आणखी शास्ती आकारु शकेल :
परंतु असे की, बिनसरकारी रेल्वेला योग्य वाटेल असे अभिवेदन करण्याची वाजवी संधी देण्यात आल्याखेरीज अशी कोणतीही शास्ती आकारली जाणार नाही.
#Railway #Act 1989 #Marathi Section 169
Section 169 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.