रेल्वे अधिनियम, १९८९
कलम १८५ :
जाहिरातीसाठी रेल्वेवरील कराधान :
१) अन्य कोणत्याही कायद्यामध्ये काही विरुद्ध अंतर्भूत असले तरी, रेल्वे प्रशासन, रेल्वेच्या कोणत्याही भागांवर केलेल्या कोणत्याही जाहिरातीपोटी, कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाला, कोणताही कर भरण्यास, केंद्र शासनाने, अधिसूचनेद्वारे, अशा अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात आलेला कर भरण्यास रेल्वे प्रशासन दायी असल्याचे घोषित केले असल्याखेरीज, दायी असणार नाही.
२) केंद्र शासनाला, पोटकलम (१) अन्वये काढलेली अधिसूचना कोणत्यावेळी प्रत्याèहत करता येईल किंवा त्यात बदल करता येईल.
#Railway #Act 1989 #Marathi Section 185
Section 185 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.