रेल्वे अधिनियम, १९८९
कलम ३८ :
अधिकरणाच्या शक्ती :
१) शपथेवर साक्ष घेणे, साक्षीदारांना उपस्थित राहण्यास भाग पाडणे, दस्तऐवजांच्या प्रकटीकरणाची व ते दाखल करण्याची सक्ती करणे, साक्षीदारांची तपासणी करण्यासाठी आयोगपत्रे काढणे या प्रयोजनांसाठी दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५) खाली दिवाणी न्यायालयाला ज्या शक्ती असतील त्या शक्ती आणि पुनर्विलोकनाची शक्ती अधिकरणास असेल आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) याचे कलम १९५ आणि प्रकरण पस्तीस यांच्या सर्व प्रयोजनांसाठी, ते एक दिवाणी न्यायालय असल्याचे मानण्यात येईल आणि अशा कलमातील किंवा प्रकरणातील एखाद्या न्यायालयाच्या पीठासीन अधिकाऱ्यासंबंधीच्या कोणत्याही निदेशात, या न्यायाधिकरणाच्या पीठासीन अधिकाऱ्यासंबंधीचे निर्देशही अंतर्भूत असल्याचे मानण्यात येईल.
२) अधिकरणास, खर्च भरण्यासंबंधीच्या आदेशांसह, परिस्थितीनुरुप आवश्यक असतील असे अंतरिम व अंतिम आदेश संमत करण्याच्या शक्तीसुद्धा असतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.