रेल्वे अधिनियम, १९८९
कलम ९४ :
रेल्वे प्रशासनाच्या मालकीच्या नसलेल्या कडरुळावर माल भरणे किंवा त्याचा बटवडा करणे :
१) जथे रेल्वे प्रशासनाच्या मालकीचय नसलेल्या कडरुळावरुन रेल्वेने वहन करण्यासाठी माल भरावयाचा असेल तेथे, जो पर्यंत रेल्वे प्रशासन आणि कडरुळ यांच्यामधील वाघिणीच्या अदलाबदलीसाठी विनिर्दिष्ट केलेल्या ठिकाणी तो माल असलेली वाघीण आणून ठेवीपर्यंत व याबाबतीत प्राधिकृत केलेल्या रेल्वे सेवकाला कडरुळाच्या चालकाने त्यानुसार कळवेपर्यंत, उद्भवणारी, कोणत्याही कारणामुळे झालेली अशा मालाची हानी, विनाश, नुकसान, मालाचा èहास होणे किंवा तो सुपूर्द न करणे या गोष्टींना ते रेल्वे प्रशासन जबाबदार असणार नाही.
२) जेथे रेल्वे प्रशासनाच्या मालकीच्या नसलेल्या कडरुळावरुन रेल्वे प्रशासनाकडून बटवडा करावयाचा असेल तेथे, रेल्वे प्रशासन आणि तो कडरुळ यांच्यामधील वाघिणींच्या अदलाबदलीसाठी विनिर्दिष्ट केलेल्या ठिकाणी प्रेषित माल असलेली वाघीण आणून ठेवल्यानंतर आणि या बाबतीत प्राधिकृत केलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याने ती वाघीण आणून ठेवण्यात आली असल्याचे त्या कडरुळाच्या मालकाला त्यानुसार कलवल्यानंतर, उद्भवणारी कोणत्याही कारणामुळे झालेली अशा प्रेषित मालाची हानी, विनाश, नुकसान, मालाचा èहास होणे किंवा तो सुपूर्द न करणे याला ते रेल्वे प्रशासन जबाबदार असणार नाही.
#Railway #Act 1989 #Marathi Section 94
Section 94 Railway Act 1989 in Marathi.
INSTALL Android APP
For Full Access Purchase Paid MemberShip : Price -150 / Yearly.
संपूर्ण अॅक्सेस साठी पेड मेंबर व्हा.
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.