अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ मराठी
अनुसूची :
कलम ३(२) (पाच-ऐ) पहा :
भारतीय दंड सहिते खालील कलम | गुन्हाचे नाव व शिक्षा :
१२०-ऐ : गुन्हेगारीचा कट
१२०-बी : गुन्हेगारी कटासाठी शिक्षा
१४१ : बेकायदेशीर जमाव
१४२ : बेकायदेशीर जमावामधील व्यक्ति
१४३ : बेकायदेशीर जमावासाठी शिक्षा
१४४ : बेकायदेशीर जमावामध्ये घातक शस्त्रे घेऊन सामील होणे
१४५ : बेकायदेशीर जमावामध्ये तो पांगापांग होणार आहे हे माहीत असून त्यात सामील होणे किंवा सतत रहाणे
१४६ : दंगल घडविणे
१४७ : दंगल घडविण्यासाठी शिक्षा
१४८ : घातक शस्त्रे घेऊन दंगल घडविणे
२१७ : कायद्याचे पालन करण्यास लोकसेवकाने नकार, शिक्षा किंवा मालमत्ता जप्त करण्यापासून वाचविण्याचा हेतू असणे
३१९ : इजा करणे
३२० : गंभीर दुखापत
३२३: स्वेच्छेने इजा करण्याबद्दल शिक्षा
३२४: स्वेच्छेने घातक शस्त्रांनी किंवा त्यासारख्या शस्त्रांनी इजा करणे
३२५ : स्वेच्छेने गंभीर दुखापत करण्याबद्दल शिक्षा
३२६-ब(बी) : स्वेच्छेने अॅसिड फेकणे किंवा फेकण्याचा प्रयत्न करणे
३३२: स्वेच्छेने लोकसेवकाला जखमी होण्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करणे
३४१ : बेकायदेशीर अवरोध करण्याबाबत शिक्षा
३५४ : स्त्रीची अप्रतिष्ठा करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा दंडनीय बळाचा वापर करणे
३५४-अ(ऐ) : लैंगिक छळवणूक आणि लैंगिक छळवणुकीसाठी शिक्षा
३५४-ब(बी) : स्त्रीची वस्त्रे उतरविण्याच्या दृष्टीने हल्ला किंवा दंडनीय जबरदस्ती करणे
३५४-क(सी) : टक लावून पहाणे (व्हॉयरिझम)
३५४-ड(डी) : पाठलाग करणे
३५९ : पळवून नेणे
३६३ : पळवून नेण्याबद्दल शिक्षा
३६५ : व्यक्तिला बेकायदेशीर रीत्या डांबून ठेवण्याच्या दृष्टीने पळवून नेणे किंवा अपहरण करणे
३७६-ब(बी) : विभक्त असताना पतीने पत्नीबरोबर लैंगिक समागम करणे
३७६-क(सी) : व्यक्तिने अधिकाराने लैंगिक समागम करणे
४४७ : बेकायदेशीर प्रवेश करणे
५०६ : बेकायदेशीय धाकदपटशा दाखविणे
५०९ : स्त्रीची अप्रतिष्ठा करण्याच्या दृष्टीने शब्द वापरणे, अंगविक्षेप करणे किंवा कश्ती करणे.
Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act 1989 index in Marathi.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.