कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम २०१३
कलम २४ :
समुचित शासनाने, हा अधिनियम प्रसिद्ध करण्याकरिता उपाययोजना करणे :
समुचित शासन, वित्तपुरवठ्याच्या व अन्य साधनसंपत्तीच्या उपलब्धतेस अधीन राहून -
(अ) कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळवणुकीविरूद्ध संरक्षणाची तरतूद करणाऱ्या या अधिनियमाच्या तरतुदीबद्दल जनतेस जाणीव करून देण्यासाठी संबंधित माहिती देईल, शिक्षण संसूचना करील व प्रशिक्षण साहित्य विकसित करील आणि जाणीवजागृती कार्यक्रम आयोजित करील.
(ब) स्थानिक तक्रार समितीच्या सदस्यांकरिता दिशानिदेशक व प्रशिक्षण कार्यक्रम तयार करील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.