महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
अनुसूची - ट :
सुधारण्यात आलेल्या अधिनियमिती :
(कलम ३३४ पहा) :
अनुक्रमांक (१)
क्रमांक व वर्ष (२)
संक्षिप्त नाव (३)
सुधारणाची व्याप्ती (४)
-------
१.
सन १८७६ चा अधिनियम क्रमांक १०
मुंबई महसूल क्षेत्राधिकार अधिनियम, १८७६
कलम ११ मधील कोणत्याही दिवाणी न्यायालयाने या मजकुराऐवजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (१९६६ चा महा.४१.) मध्ये अन्यथा स्पष्टपणे तरतूद करण्यात आली असेल त्याशिवाय कोणत्याही दिवाणी न्यायालयाने हा मजकूर दाखल करण्यात येईल .
----------
२.
सन १९४८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ६७.
मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८
१.प्रकरण ५ -ट वगळण्यात येईल ;
२.कलम ७० मध्ये खंड (नअ) वगळण्यात येईल
३.कलम ७४, पोट-कलम (१), खंड (ट) वगळण्यात येईल ;
४.कलम ८१, पोट-कलम (१) च्या कोष्टकातील, कलम ६६-अ संबंधातील नोंदी वगळण्यात येतील.
५.कलम ८२, पोट-कलम (२),खंड (लअ) वगळण्यात येईल.
------------
३.
सन १९५० चा हैद्राबाद अधिनियम क्रमांक २१.
सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४५ अन्वये पुन्ह अधिनियमित वैधकरण करण्यात व आणखी सुधारण्यात आल्याप्रमाणे हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९५०
१.प्रकरण ५-अ वगळण्यात येईल.
२.कलम ९६, पोट-कलम (१) मधील कोष्टकातील कलमे ५०-ड व ५०-फ संबंधातील शेवटच्या दोन नोंदी वगळण्यात येतील ; १.(**)
-----------
४.
सन १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ९९.
मुंबई कुळवहिवाट व शेत-जमीन (विदर्भ प्रदेश) अधिनियम, १९५८
१.प्रकरण ९ वगळण्यात येईल ;
२.कलम १०७, पोट-कलम (१) खंड (झेड) वगळण्यात येईल;
३.कलम ११७, पोट-कलम (१) मधील कोष्टकातील कलम ९३ संबंधीच्या सर्व नोंदी वगळण्यात येतील.
--------------
१.सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११, कलम ३, दुसरी अनुसूची याअन्वये ही नोदं वगळण्यात आली.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६अनुसूची-ट
#MLRCAct1966MarathischeduleK #scheduleKMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.