शस्त्र अधिनियम १९५९
कलम ३५
विवक्षित प्रकरणी परिवास्तूच्या ताबाधारक व्यक्तींची अपराधविषयक जबाबदारी :
ज्यांच्याबाबतीत या अधिनियमानुसार कोणताही अपराध घडलेला आहे किंवा घडत आहे अशी कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा वेगवेगळ्या व्यक्तींच्या संयुक्त ताब्यात किंवा संयुक्त नियंत्रणाखाली असलेल्या एखाद्या परिवास्तूत, वाहनात किंवा अन्य ठिकाणी सापडली किंवा सापडला असून त्या परिवास्तूत, वाहनात किंवा अन्य ठिकाणी शस्त्रे किंवा दारूगोळा असल्याबाबत अशांपैकी ज्या ज्या व्यक्तीला जाणीव होती असे समजण्यास कारण असेल ती प्रत्येक व्यक्ती, विरूद्ध शाबीत न झाल्यास त्या अपराधाबद्दल, तो जणू काही फक्त तिच्याकडूनच घडलेला असावा किंवा घडत असावा त्याप्रमाणे दायी असेल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.