हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम १८ :
हिन्दू विवाहाच्या अन्य विवक्षित शर्तींच्या व्यतिक्रमणाबद्दल शिक्षा :
जी जी व्यक्ती कलम ५ च्या खंड (तीन), चार १.(व (पाच)) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तींचे व्यतिक्रमण करुन या अधिनियमाखाली स्वत:चा विवाह विधिपूर्वक घडवून आणील अशी प्रत्यके व्यक्ती, -
२.(क) कलम ५ च्या खंड (तीन) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तींच्या व्यतिक्रमणाच्या बाबतीत, दोन वर्षांपर्यंत असू शकेल अशा कठोर कारावासास, किंवा एक लाख (लक्ष) रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास, किंवा दोन्ही शिक्षांस;)
ख) कलम ५ च्या खंड (चार) किंवा खंड (पाच) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या शर्तीच्या व्यतिक्रमणाच्या बाबतीत, एक महिन्यापर्यंत असू शकेल अशा साध्या कारावासास, किंवा एक हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस;
३.(*)
पात्र असेल.
४.(*)
---------
१. १९७८ चा अधिनियम २ कलम ६ व अनुसूची यांद्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
२. २००७ के अधिनियम सं० ६ की धारा २० द्वारा प्रतिस्थापित ।
३. १९७८ चा अधिनियम २ कलम ६ व अनुसूची यांद्वारे गाळले.
४. १९७८ चा अधिनियम २ कलम ६ व अनुसूची यांद्वारे गाळले.
#HinduMarriageAct1955Marathi #HinduMarriageActMarathisection18 #हिंदूविवाहअधिनियम१९५५कलम१८
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.