हिंदू विवाह अधिनियम १९५५
कलम ५ :
हिंदू विवाहाच्या शर्ती :
पुढील शर्ती पूर्ण झाल्यास, कोणत्याही दोन हिंदूमध्ये विवाह विधिपूर्वक लावता येईल; त्या शर्ती अशा -
एक) विवाहाच्या वेळी कोणत्याही पक्षास हयात विवाहसाथी नसावा;
१.(दोन) विवाहाच्या वेळी कोणताही पक्ष, -
क) मनोविकलतेमुळे विवाहास विधिग्राह्य संमती देण्यास असमर्थ नसावा; किंवा
ख) विधिग्राह्य संमती देण्यास समर्थ असला तरी, विवाह करण्यास आणि संततीला जन्म देण्यास अपात्र ठरेल अशा प्रकारचा वा अशा प्रमाणात त्याच्यात मानसिक बिघाड झालेला नसावा; किंवा
ग) त्याला वारंवार भ्रमिष्टपणाचे वा अपस्माराचे झटके नसावेत.)
तीन) विवाहाच्या वेळी वराच्या वयाला २.(एकवीस वर्षे) व वधूच्या वयाला २.(अठरा वर्षे) पूर्ण झालेली असावीत.
चार) पक्ष निषिद्ध नातेसंबंधाच्या श्रेणींच्या अंतर्गत नसावेत - मात्र त्यांच्यापैकी प्रत्येकाचे नियंत्रण करणाऱ्या रुढीने किंवा परिपाठाने उभयतांमधील विवाहास मुभा दिलेली असेल तर तो अपवाद समजावा;
पाच) पक्ष एकमेकांचे सपिंड नसावेत - मात्र त्यांच्यापैकी प्रत्येकाचे नियंत्रण करणाऱ्या रुढीने किंवा परिपाठाने उभयतांमधील विवाहास मूभा दिलेली असेल तर तो अपवाद समजावा;
३.(***)
--------
१. १९७६ चा अधिनियम ६८, कलम २ द्वारे खंड (दोन) ऐवजी घातले.
२. १९७८ चा अधिनियम २, कलम ६ व अनुसूची यांद्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
३. १९७८ चा अधिनियम २, कलम ६ व अनुसूची यांद्वारे गाळले.
#HinduMarriageAct1955Marathi #HinduMarriageActMarathisection5 #हिंदूविवाहअधिनियम१९५५कलम५
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.