महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २४४ :
महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्यासमोर ज्यांना उपस्थित होता येईल आणि अर्ज करता येईल अशा व्यक्ती :
त्या त्या वेळी अमलात असलेलया इतर कोणत्याही अधिनियमात अन्यथा तरतूद करण्यात आली असेल त्या व्यतिरिक्त कोणत्याही महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्यासमोर या संहितेअन्वये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही अन्य कायद्यान्वये उपस्थित होणे, त्यास अर्ज करणे व त्याच्यासमोर काम चालविणे, या सर्व गोष्टी स्वत: पक्षकारास किंवा त्यांनी मान्यता दिलेल्या अभिकत्र्यांस अथवा कोणत्याही विधिव्यवसायीस करता येतील ;
१९०८ चा ५. -परतुं, महसूल किंवा भू-मापन अधिकारी, तसा निदेश देईल, तर दिवाणी प्रक्रीया संहिता, १९०८ ची कलमे १३२ व १३३ यांच्या तरतुदींना अधीन राहून, पक्षाकार जातीने उपस्थित राहील.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२४४
#MLRCAct1966Marathisection244 #section244MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.