महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ४ :
महसूली क्षेत्र घटित करणे :
१)राज्य शासनाला, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे-
(एक) ज्या जिल्हयांचा मिळून एक विभाग होईल ते जिल्हे १.(मुंबई शहर धरून )
(दोन) ज्या उप-विभागांचा मिळून एक जिल्हा होईल ते उप-विभाग;
(तीन) ज्या तालूक्यांचा मिळून एक उप-विभाग होईल ते तालूके;
(चार) ज्या गावांचा मिळून एक तालूका होईल ती गावे;
(पाच) ज्या स्थानिक क्षेत्रांचे मिळून एक गाव होईल ते स्थानिक क्षेत्र ; या गोष्टी विनिर्दिष्ट करता येतील; आणि
(सहा) अशा रितीने घटित करण्यात आलेल्या अशा कोणत्याही महसूली क्षेत्राच्या हद्दींमध्ये एकीकरण करून, विभागणी करून किंवा इतर कोणत्याही रितीने फेरबदल करता येईल किंवा असे कोणतेही महसुली क्षेत्र रद्द करता येईल आणि अशा कोणत्याही महसूली क्षेत्रास नाव देता येईल व त्याच्या नावामध्ये फेरबदल करता येईल; आणि जेव्हा कोणत्याही क्षेत्रास पुन्हा नाव दिले असेल अशा कोणत्याही बाबतीत, कोणत्याही कायद्यान्वये, लेखामध्ये किंवा इतर दस्तऐवजामध्ये त्या क्षेत्रासंबंधी त्याच्या मूळच्या नावाने असलेले सर्व उल्लेख हे, अन्यथा स्पष्टपणे तरतूद केली नसेल, तर त्या क्षेत्रात पुन्हा जे नाव दिलेले असेल त्या नावासंबंधीचे उल्लेख असल्याचे समजण्यात येईल;
पंरतु, या संहितेच्या प्रारंभानंतर शक्य तितक्या लवकर, राज्य शासन, तत्सम अधिसूचनेद्वारे प्रत्येक वाडी आणि वेगळे निवासस्थान असलेल्या एखाद्या गावाच्या गावठाणाच्या हद्दीबाहेरील कोणतेही क्षेत्र, गाव म्हणून प्रस्थापित करील (अशा वाडीची किंवा क्षेत्राची लोकसंख्या २.(जी तहसीलदाराच्या दर्जाहून कमी दर्जाचा नसेल असा महसूल अधिकारी निश्चित करील ) अशी तीनशेपेक्षा कमी नसेल) आणि अशा रीतीने प्रस्थापित केलेल्या गावाच्या हद्दी त्या अधिसूचनेत निर्दिष्ट करील.
२)जिल्हाधिकाऱ्यास, विहित केलेल्या रीतीने प्रसिध्द करण्यात आलेल्या आदेशाद्वारे, तालूक्यातील ज्या गावांचा मिळून एक साझा होईल अशा गावांची, आणि तालुक्यातील ज्या साझ्यांचे मिळून एक मंडल होईल अशा साझ्यांची रचना करता येईल आणि अशा रितीने रचना करण्यात आलेल्या कोणत्याही साझ्याच्या किंवा मंडलाच्या हद्दींमध्ये फेरबदल करता येईल किंवा कोणत्याही साझा किंवा मंडल रद्द करता येईल.
३)ही संहिता अंमलात येण्याच्या वेळी अस्तित्वात असलेले विभाग, जिल्हे, उप-विभाग, तालुके, मंडले, साझे आणि गावे ही, या कलमान्वये अन्यथा त्यात फेरबदल केले नसतील तर, असे विभाग, जिल्हे, उप-विभाग, तालुके, मंडले, साझे आणि गावे म्हणून त्यांची अनुक्रमे जी नावे असतील त्याच नावाने चालू राहतील.
४)१९०४ चा मुंबई १ - या कलमान्वये काढलेली प्रत्येक अधिसूचना किंवा आदेश पूर्वप्रसिध्दीच्या शर्तीस अधीन असेल;आणि ३.(मुंबई सर्वसाधारण परिभाषा अधिनियम), १९०४ याच्या कलम २४ च्या तरतुदी ज्याप्रमाणे पूर्वप्रसिध्दीनंतर करावयाच्या नियमांच्या संबंधात लागू होतात त्याप्रमाणे त्या शक्य असेल तेथवर, अशा अधिसूचनेच्या किंवा आदेशाच्या संबंधात लागू होतील .
---------
१. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४७, कलम ३ व ४ द्वारे (मुंबई शहर वगळून) याऐवजी हा मजकूर दाखल करण्यात आला.
२. सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ८, कलम २ अन्वये तीनशेपेक्षा या शब्दाऐवजी हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
३. सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ याच्या कलम २ आणि ३, अनुसूची द्वारे महाराष्ट्र सर्वसाधारण परिभाषा अधिनियम अशी सुधारणा करण्यात आली.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम४
#MLRCAct1966Marathisection4 #section4MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.