महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९
कलम २८ :
प्रमाणित संस्था व भारताच्या निरनिराळ्या भागांतील तशाच प्रकारची संस्था यांच्या दरम्यान स्थानांतरण :
(१) प्रमाणित संस्थेत अटकावून ठेवलेल्या कोणत्याही व्यक्तीस भारताच्या इतर भागांतील तशाच प्रकारच्या कोणत्याही संस्थेत स्थानांतरण करण्याविषयी निदेश देण्याचा राज्य शासनास अधिकार आहे. मात्र त्या भागाच्या राज्य शासनाने तेथे अमलात असलेल्या कोणत्याही विधिअन्वये त्या भागांतील अशा संस्थेची व्यवस्था महाराष्ट्र राज्यातील व्यवस्थेप्रमाणे केलेली असली पाहिजे :
परंतु, ह्या कलमान्वये कोणत्याही व्यक्तीचे कोणत्याही इतर राज्यात स्थानांतरण त्या राज्याच्या शासनाच्या संमतीवाचून करता कामा नये.
(२) ज्या व्यक्तीच्या संबंधात भारताच्या इतर कोणत्याही भागातील सक्षम प्राधिकाऱ्यांकडून प्रमाणित संस्थेत किंवा तत्सम स्वरूपाच्या संस्थेत तीस अटकावून ठेवण्याबद्दल ह्या अधिनियमान्वये देण्यात येणाऱ्या आदेशासारखा अटकावून ठेवण्याविषयी आदेश देण्यात आला असेल त्या व्यक्तीचे स्थानांतरण महाराष्ट्र राज्यातील प्रमाणित संस्थेत करण्यास अशा संस्थेच्या अधीक्षकाशी सल्लामसलत करून संमती देण्याचा राज्य शासनास अधिकार आहे आणि अशा रीतीने स्थानांतरण करण्यात आल्यानंतर या अधिनियमाचे उपबंध अशा व्यक्तीच्या बाबतीत लागू होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.