मोटार वाहन अधिनियम १९८८
कलम १६३-अ
पुर्वनिर्धारित सुत्र (स्ट्रक्चर्ड फॉम्युला) तत्त्वावर भरपाई देण्याबाबतची खास तरतूद :
१) या अधिनियमामध्ये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यामध्ये किंवा कायद्याप्रमाणेच अंमल असलेल्या कोणत्याही संलेखामध्ये काहीही अंतर्भूत असेल, तरी मोटार वाहनाचा वापर केल्यामुळे झालेल्या अपघातात कोणाचा मृत्यू होईल किंवा त्याला कायमचे अपंगत्व आल्यास मोटार वाहनाचा मालक किंवा प्राधिकृत विमाकार प्रकरणपरत्वे कायदेशीर वारसांना किंवा कायमचे अपंगत्व आलेल्याला, दुसऱ्या अनुसूचीमध्ये दर्शवलेली भरपाई देण्यास पात्र असेल.
स्पष्टीकरण - या पोट - कलमाच्या प्रयोजनार्थ, कायमचे अपगंत्व या शब्दप्रयोगाला श्रमिक भरपाई अधिनियमात जो अर्थ आणि जी व्यप्ती दिलेली आहे तोच अर्थ व तीच व्याप्ती असेल.
२) पोट-कलम (१) खालील भरपाई मिळण्यासाठी केलेल्या कोणत्याही मागणीमध्ये असा युक्तिवाद करण्याची किंवा असे शाबीत करण्याची गरज असणार नाही, की ज्यासंबंधात मागणी करण्यात आलेली असेल तो मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व हे संबंधित वाहनाच्या किंवा वाहनांच्या मालकाच्या अथवा इतर कोणत्याही व्यक्तीच्या दोषपूर्ण कृतीमुळे किंवा हयगयीमुळे किंवा कसुरीमुळे ओढविलेले होते.
३) केंद्र सरकारल राहणीखर्च विचारात घेऊन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, दुसऱ्या अनुसूचीमध्ये वेळोवेळी सुधारणा करता येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.