मोटार वाहन अधिनियम १९८८
प्रकरण २ :
मोटार वाहनांच्या चालकांना लायसन देणे :
कलम ३
चालाकाच्या लायसनाची गरज :
१) कोणत्याही व्यक्तीने, तिला वाहन चालविण्यासाठी प्राधिकार देणारे, तिला देण्यात आलेले चालकाचे परिणामकारक लायसन धारण करीत असल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी कोणतेही एखादे मोटार वाहन चालविता कामा नये आणि कोणत्याही व्यक्तीने तिच्या चालकाच्या लायसनमध्ये तिला विनिर्देशपूर्वक तसे अधिकार प्रदान करण्यात आल्याशिवाय (तिच्या स्वत:च्या वापरासाठी भाड्याने घेतलेली किंवा कलम ७५ च्या पोट-कलम (२) खालील कोणत्याही योजनेखाली भाड्याने घेतलेली मोटार कॅब (किंवा मोटार सायकल) याखेरीज एखादे परिवहन वाहन अशा प्रकारे चालविता कामा नये.
२) मोटार वाहन चालविण्याच्या बाबतीतील निदेश मिळालेल्या व्यक्तीला ज्या शर्तींच्या अधीनतेने पोट-कलम (१) लागू होणार नाही त्या शर्ती केंद्र सरकारकडून विहित करण्यात येतील अशा असतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.