गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५
कलम ३६-ड :
संक्रमणकालीन तरतुदी :
१) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (सुधारणा) अधिनियम, १९८८ याच्या प्रारंभाच्या दिवशी किंवा त्यानंतर, कलम ३६ अन्वये विशेष न्यायालयाची स्थापना करण्यता येईपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही, या अधिनियमाखाली करण्यात आलेल्या कोणत्याही अपराधाची न्यायचौकशी सत्र न्यायालयाकडून करण्यात येईल.
२) गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (सुधारणा) अधिनियम, १९८८ याच्या प्रारंभाच्या दिवशी किंवा त्यानंतर, घडलेल्या सदर अधिनियमाखालील कोणत्याही अपराधाची संपरिक्षा सत्र न्यायालयाकडे प्रलंबीत असल्यास पोटकलम (१) मध्ये काहीही अंतरभूत असले तरी सत्र न्यायालयाने अशी संपरिक्षा सुनावणी घेऊन निकाली काडावे.
परतुं पोट कलम (१) मध्ये नमुद केलेल्या तरतुदींची दखल घेण्यासाठी कोणताही खटला किंवा खटले सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यासाठी, फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) च्या कलम ४०७ च्या तरतुदीचा उच्च न्यायालयाच्या अधिकारावर या पोट कलमाचा काहीही परिणाम होणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.