महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम १२९-ब
नोंदविलेला वैद्यक व्यवसायी इत्यादी यांनी दिलेले लेख किंवा प्रतिवृत्ते वगैरे पुरावा असणे :
जो कोणताही लेख हा :
अ) नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीने किंवा शासनाच्या रसायन परीक्षकाने किंवा सहायक रसायन परीक्षकाने किंवा त्या कलमाच्या पोट-कलम (१) अन्वये नेमलेल्या अधिकाऱ्याने कलम १२९-अ अन्वये त्याच्या सहीशिक्क्यानिशी दिलेले प्रमाणपत्र असेल किंवा
ब) राज्य शासनाने किंवा स्थानिक प्राधिकाऱ्याने चालविलेल्या कोणत्याही रूग्णालयातील किंवा दवाखान्यातील कोणत्याही नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीने किंवा ह्याबाबत राज्या शासनाने प्राधिकृत केलेल्या कोणत्याही इतर नोंदलेल्या वैद्यक व्यवसायीने त्याने कोणत्याही व्यक्तीच्या तपासणीसंबंधीचे किंवा त्याच्याकडे तपासणीसाठी किंवा पृथक्करणासाठी आणि प्रतिवृत्तासाठी योग्य रीतीने सादर केलेल्या गोष्टीसंबंधीचे त्याच्या सहीशिक्क्यानिशी दिलेले प्रतिवृत्त असेल.
तर असा लेख ह्या अधिनियमान्वयेच्या कोणत्याही कारवाईत, यथास्थिती त्या प्रमाणपत्रात किंवा प्रतिवृत्तात नमूद केलेल्या वस्तुस्थितीचा पुरावा म्हणूनवापरता येईल, परंतु फिर्यादीने किंवा आरोपी व्यक्तीने अर्ज केल्यास न्यायालयास अशा व्यक्तीस आज्ञापत्र काढून बोलाविण्याचा आणि यथास्थिती प्रमाणपत्रातील किंवा प्रतिवृत्तातील वादविषयाबद्दल अशा व्यक्तीची तपासणी करता येईल आणि न्यायालयाने त्यास योग्य वाटले तर अशा व्यक्तीस आज्ञापत्र काढून बोलाविले पाहिजे आणि यथास्थिती प्रमाणपत्रातील किंवा प्रतिवृत्तातील वायविषयाबद्दल अशा व्यक्तीची तपासणी केली पाहिजे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.