महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम १३२
जप्त केलेल्या वस्तू :
कलम १२९ अन्वये अधिकार चालवून एखाद्या दारूबंदी अधिकाऱ्याने किंवा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याने या अधिनियमाच्या तरतुदींअन्वये कोणत्याही वस्तू जप्त केल्या असतील किंवा ह्या अधिनियमाच्या तरतुदीनुसार कोणत्याही वस्तू त्याच्याकडे पाठविण्यात आल्या असतील तेव्हा अशा अधिकाऱ्याने आवश्यक वाटेल ती चौकाक्ष केल्यानंतर.
अ) अटक केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या खटल्यात पुराव्यादाखल अशा वस्तूची आवश्यकता आहे असे दिसून आले, तर अशा व्यक्तीस ज्या दंडाधिकाऱ्यांकडे पाठविले असेल किंवा ज्याच्यापुढे हजर राहण्याबद्दल जामीन घेतला असेल त्या दंडाधिकाऱ्यांकडे ती वस्तू पाठविली पाहिजे.
ब) जर अशी वस्तू जप्त केली जाण्यास पात्र आहे परंतु वर सांगितल्याप्रमाणे पुरावा म्हणून त्याची आवश्यकता नाही असे दिसून आले, तर ती जप्त केल्याच्या तपशिलाच्या संपूर्ण प्रतिवृत्तासह जिल्हाधिकाऱ्याकडे पाठविली पाहिजे.
क) जर कोणताही अपराध केल्याचे दिसून आले नाही, तर ज्या व्यक्तीच्या कब्जातून ती वस्तू घेतली असेल तिला ती परत केली पाहिजे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.