१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ५७
अनुज्ञप्ती जप्त करणे :
कोणत्याही इतर कलमात काहीही असले तरी, अनुज्ञप्ती धारण करणाऱ्या व्यक्तीने द्यावयाचे कोणतेही शुल्क किंवा फी देण्यात कसूर केल्यामुळे ते अनुज्ञप्ती त्या कलमान्वये रद्द होण्यास पात्र होईल तेव्हा, असे अनुज्ञप्ती देणाऱ्या प्राधिकाऱ्यास ते जप्त करण्याचा व त्याअन्वये चालणारा धंदा आपल्या व्यवस्थेखाली घेण्याचा अधिकार आहे आणि अशा व्यवस्थेपासून झालेल्या नफ्याची रक्कम ही, अशा जप्तीबद्दल व व्यवस्थेबद्दल झालेला सर्व खर्च भागविण्यात आल्यानंतर, थकबाकीच्या ज्या रकमेसाठी असे लायसन्न जप्त करण्यात आले ती रक्कम आणि अशा अनुज्ञप्तीच्या बाकीच्या मुदतीत त्याबद्दल द्यावयाची रक्कम यांच्यापेक्षा कमी असल्यास अशी कमी पडणारी रक्कम जणू ती ह्या अधिनियमाच्या कोणत्याही एका तरतुदी अन्वये द्यावयाचे शुल्क किंवा फी आहे असे समजून अनुज्ञप्तीदराकडून वसूल करण्यात येईल; परंतु अशी नफ्याची रक्कम अनुज्ञप्तीअन्वये द्यावयाच्या रकमेपेक्षा अधिक झाल्यास अशा कोणत्याही फायद्याची रक्कम मिळण्याचा अनुज्ञप्तीदारास हक्क असणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.