१.महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ६-अ
तज्ञ मंडळ :
१) अ) मद्यार्क असलेला कोणताही औषधीय किंवा प्रसाधनीय सिद्धपदार्थ किंवा
ब) मद्यार्क असलेला कोणताही पुर्तिप्रतिबंधक सिद्धपदार्थ किंवा द्रावण किंवा
क) मद्यार्क असलेला कोणताही स्वाद आणणारा अर्क, सत्त्व किंवा सरबत मादक दारू म्हणून वापरण्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे ठरविणे राज्य शासनास शक्य व्हावे म्हणून राज्य शासनाने एक तज्ञ मंडळ स्थापन केले पाहिजे.
२) पोटकलम १) अन्वये स्थापन केलेल्या तज्ञमंडळात विहित करण्यात येतील अशा पात्रता असलेले कमीत कमी पाच सदस्य असतील. अशा रीतीने नेमलेले सदस्य राज्य शासनाची मर्जी असेल तोपर्यंत पद धारण करतील.
३) मंडळाचे कामकाज पार पाडण्यासाठी तीन सदस्य हजर असले म्हणून गणपूर्ती होईल.
४) मंडळाच्या सदस्याची कोणतीही रिकामी झालेली जागा शक्य तितक्या लवकर भरण्यात आली पाहिजे :
परंतु, अशी कोणतीही जागा रिकामी झाली त्या मुदतीत, विद्यमान सदस्यांना जणू कोणतीही जागा रिकामी झाली नव्हती असे समजून काम करता येईल.
५) मंडळाच्या कामासंबंधीची कार्यपद्धती विहित करण्यात येईल अशी असेल.
६) पोटकलम (१) मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ हा मादक दारू म्हणून वापरण्यास योग्य आहे किंवा नाही या प्रश्नावर व तसेच राज्य शासनाने याच्याकडे पाठविलेल्या प्रश्नांशी आनुषंगिक असणाऱ्या कोणत्याही बाबींविषयी राज्य शासनाला सल्ला देणे हे मंडळाचे कर्तव्य असेल. असा सल्ला मिळाल्यावर, राज्य शासनाने असा कोणताही पदार्थ मादक दारू, म्हणून वापरण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरविले पाहिजे आणि राज्य शासनाने, तो पदार्थ अशा रीतीने वापरण्यास योग्य आहे असे ठरविल्यावर, जोपर्यंत त्याविरूद्ध सिद्ध करण्यात आले नसेल तोपर्यंत असा पदार्थ मादक दारू म्हणून वापरण्यास योग्य आहे असे गृहित धरण्यात येईल.
७) पोटकलम १) मध्ये नमूद केलेला कोणताही पदार्थ हा मादक दारू म्हणून वापरण्यास योग्य आहे किंवा नाही या प्रश्नावर व तसेच राज्य शासनाने याच्याकडे पाठविलेल्या प्रश्नांशी आनुषंगिक असणाऱ्या कोणत्याही बाबींविषयी राज्य शासनाला सल्ला देणे हे मंडळाचे कर्तव्य असेल. असा सल्ला मिळाल्यावर, राज्य शासनाने असा कोणताही पदार्थ मादक दारू, म्हणून वापरण्यास योग्य आहे किंवा नाही हे ठरविले पाहिजे आणि राज्य शासनाने, तो पदार्थ अशा रीतीने वापरण्यास योग्य आहे असे ठरविल्यावर, जोपर्यंत त्याविरूद्ध सिद्ध करण्यात आले नसेल तोपर्यंत असा पदार्थ मादक दारू म्हणून वापरण्यास योग्य आहे असे समजले पाहिजे.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.