महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११९ :
प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा:
(ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही क्षेत्राबाहेरील) कोणत्याही जागेतील जी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्राण्यास निर्दयपणे मारील, मारावयास लावील किंवा मार बसेल असे घडवून आणील किंवा त्यास निर्दयपणे वाईट रीतीने वागवील किंवा तसे वाईट रीतीने वागविले जाईल असे घडवून आणील किंवा त्याचे निर्दयपणे हाल करील किंवा करवील किंवा तसे हाल केले जातील असे घडवून आणील तीस, अपराधसिद्धीनंतर एक महिन्यापर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा होईल किंवा १(अडीच हजार रुपयांपर्यंतच्या) दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
*१- २००० चा महा. अधिनियम क्र. ४० कलम १८ ते २० द्वारे घातला.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.