अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५
कलम ६-ख :
अत्यावश्यक वस्तूचे अधिहरण करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस काढणे :
१.(१) कलम ६-क खाली २.(कोणत्याही ३.(अत्यावश्यक वस्तूचे, आवेष्टनाचे, आच्छादनाचे, पात्राचे, जनावराचे, वाहनाचे, जलयानाचे किंवा अन्य यानाचे)) अधिहरण करण्याबाबतचा आदेश, अशा ३.(अत्यावश्यक वस्तूचे, आवेष्टनाचे, आच्छादनाचे, पात्राचे, जनावराचे, वाहनाचे, जलयानाचे किंवा अन्य यानाचे) मालकाला अथवा जिच्याकडून ४.(ती अभिग्रहण करण्यात आली असेल) त्या व्यक्तीला -
क) ज्या कारणांवरुन ३.(अत्यावश्यक वस्तूचे, आवेष्टनाचे, आच्छादनाचे, पात्राचे, जनावराचे, वाहनाचे, जलयानाचे किंवा अन्य यानाचे) अधिहरण करण्यात येत आहे ती कारणे कळविणारी लेखी नोटीस देण्यात आल्याशिवाय;
ख) अधिहरणाच्या कारणाविरुद्ध, नोटिशीमध्ये विनिर्दिष्ट असेल अशा वाजवी मुदतीत लेखी अभिवेदन करण्याची संधी दिल्याशिवाय; आणि
ग) त्याबाबतीत त्याला आपले म्हणणे मांडण्याची वाजवी संधी दिल्याशिवाय काढला जाणार नाही.
५.(२) जर कोणत्याही जनावराच्या, वाहनाच्या,जलयानाच्या किंवा अन्य यानाच्या मालकाने आपल्या स्वत:च्या, त्याचा कोणताही एजंट असल्यास त्या एजंटाच्या आणि असे जनावर, वाहन, जलयान किंवा अन्य यान ताब्यात असणाऱ्या व्यक्तीच्या नकळत त्या जनावराचा, वाहनाचा, जलयानाचा किंवा त्या अन्य यानाचा अत्यावश्यक वस्तूची ने-आण करण्यासाठी वापर करण्यात आला होता, किंवा असा वापर उक्त मालक, एजंट आणि उक्त व्यक्ती यांच्या मूकानुमतीने झाला नव्हता, आणि तसेच त्यापैकी प्रत्येकाने असा वापर करण्यात येऊ नये म्हणून सर्व वाजवी व आवश्यक असे सावधगिरीचे उपाय योजले होते असे, जिल्हाधिकाऱ्याची खात्री होईल. अशा रीतीने सिद्ध करुन दाखवले तर त्या बाबतीत, पोटकलम (१) च्या उपबंधास बाध न येता, ते जनावर, वाहन, जलयान किंवा अन्य यान याचे कलम ६-क अन्वये अधिहरण करण्याविषयी कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.)
६.(३) कोणतीही अत्यावश्यक वस्तू, आवेष्टन, आच्छादन, पात्र, जनावर, वाहन, जलयान किंवा अन्य यान अधिहरण करण्याचा आदेश काढण्यापूर्वी, पोटकलम (१) च्या खंड (क) खाली नोटीस देताना जर त्या खंडातील उपबंधाचे सारत: पालन झाले असेल तर, एरव्ही त्या नोटिशीत काही उणीव राहिली वा गैरनियम बाब झाली म्हणून तेवढ्या कारणावरुन तो आदेश विधिबाह्य ठरणार नाही.)
-----------
१. १९७४ चा अधिनियम ३०, कलम ५ द्वारे कलम ६ख याला त्याचे पोटकलम (१) म्हणून नवीन क्रमांक दिला.
२. १९६७ चा अधिनियम ३६, कलम ५ द्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
३. १९७४ चा अधिनियम ३०, कलम ५ द्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
४. १९६७ चा अधिनियम ३६, कलम ५ द्वारे मूळ मजकुराऐवजी घातले.
५. १९७४ चे अधिनियम ३०, कलम ५ द्वारे समाविष्ट करण्यात आला (२२ जून, १९७४ रोजी व तेव्हापासून).
६. १९७६ चा अधिनियम ९२, कलम ५ द्वारे घातले.
#EssentialCommoditiesAct1955Marathi #ECAActmarathisection6b #अत्यावश्यकवस्तुअधिनियम१९५५कलम६-ख
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.