अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५
कलम ६-ग :
अपील :
१) कलम ६-क खाली काढण्यात आलेल्या अधिहरणाच्या आदेशामुळे आपल्यावर अन्याय झाला आहे असे वाटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, असा आदेश तिला कळविण्यात आल्याच्या दिनांकापासून एका महिन्याच्या आत कोणत्याही अशा न्यायिक प्राधिकरणाकडे अपील करता येईल जे संबंधित राज्य सरकार द्वारा नियुक्त केलेल असेल व ते न्यायिक प्राधिकारण अपीलकत्र्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर, स्वत:स योग्य वाटेल त्याप्रमाणे, ज्यांच्याविरुद्ध अपील करण्यात आले आहे तो आदेश कायम करणारा, त्यात आपरिवर्तन करणारा किंवा तो रद्दबातल करणारा असा आदेश काढील.
२) जेव्हा कलम ६-क खालील आदेश २.(त्या राज्य शासनाकडून) आपरिवर्तित किंवा रद्दबातल करण्यात आला असेल अथवा ज्या आदेशाच्या संबंधात कलम ६-क खाली अधिहरणाचा आदेश देण्यात आला आहे त्या आदेशाचे व्यतिक्रमण केल्याबद्दल सुरु करण्यात आलेल्या अभियोगात निबद्ध असलेल्या व्यक्तीला दोषमुक्त करण्यात आले असेल आणि दोन्ही प्रकरणी ३.( अभिग्रहण करण्यात आलेली अत्यावश्यक वस्तू कोणत्याही कारणास्तव परत करता येणे) शक्य नसेल तर, ३.(ती आवश्यक वस्तू जणू काही) शासनाला विकण्यात आलेली असावी त्याप्रमाणे २.(अशा व्यक्तींना कलम ६-क च्या पोटकलम (३) मध्ये उपबंधित केलेले खेरीजकरुन एरव्ही) तिची किंमत, ४.( त्या अत्यावश्यक वस्तूच्या ) अभिग्रहणाच्या दिवसापासून परिगणना करुन ठरवलेल्या वाजवी व्याजसहित देण्यात येईल ३.(आणि अशी किंमत -
एक) अन्नधान्ये, खाद्य तेलबिया किंवा खाद्य तेले यांच्या बाबतीत, कलम ३, पोटकलम (३-ख) च्या उपबंधानुसार;
दोन) साखरेच्या बाबतीत, कलम ३, पोटकलम (३-ग) च्या उपबंधानुसार; आणि
तीन) अन्य कोणत्याही अत्यावश्यक वस्तूच्या बाबतीत, कलम ३, पोटकलम (३) च्या उपबंधानुसार,
ठरवली जाईल.)
---------
१. १९६७ चा अधिनियम ३६, कलम ६ द्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केला.
२. १९६७ चा अधिनियम ३६, कलम ६ द्वारे मूळ मजकुराऐवजी दाखल केला.
३. १९६७ चा अधिनियम ३६, कलम ६ द्वारे विवक्षित शब्दांऐवजी घातला.
४. १९६७ चा अधिनियम ३६, कलम ६ द्वारे वस्तूंच्या या ऐवजी घातले.
#EssentialCommoditiesAct1955Marathi #ECAActmarathisection6c #अत्यावश्यकवस्तुअधिनियम१९५५कलम६-ग
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.