महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१
महाराष्ट्र राज्यातील जमीन व जमीन महसूल यांच्या संबंधीच्या कायद्यांचे एकीकरण
करण्यासाठी आणि त्यात दुरूस्ती करण्यासाठी अधिनियम
ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्यातीलल जमीन व जमीन महसूल यांच्या संबंधीच्या कायद्यांचे एकीकरण करणे व त्यात दुरूस्ती करणे आणि तत्संबंधित बाबींची तरतूद करणे इष्ट आहे; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या सोळाव्या वर्षी, याद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे :-
प्रकरण एक :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव व प्रारंभ :
१) या अधिनियमास, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ असे म्हणावे.
२) ही संहिता संबंध महाराष्ट्र राज्यास लागू असेल;
परंतु प्रकरण तीन (जमिनीवरील अतिक्रमणांच्या संबंधातील तरतुदी खेरीज करून ) चार,पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा (कलम २४२ खेरीज करून ) आणि सोळा (कलमे ३२७,३२९,३३० १.(३३०-क), ३३५,३३६ आणि ३३७ खेरीज करून) यांच्या तरतुदी मुंबई शहरास लागू होणार नाहीत.
३) राज्य शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे नेमील अशा २.(दिनांकास) तो संबंध महाराष्ट्र राज्यात अंमलात येईल आणि निरनिराळ्या तरतुदींसाठी निरनिराळे दिनांक नेमता येतील.
---------------
१. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३५, कलम २ द्वारे हा मजकूर समाविष्ट केला.
२. १५ ऑगस्ट १९६७ (शासकीय अधिसूचना, वित्त विभाग, क्रमांक यूएनएफ- १०६७ आर, दिनांक ११ ऑगस्ट १९६७ पहा.)
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम१
#MLRCAct1966Marathisection1 #section1MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.