महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम १० :
तात्पुरत्या रिकाम्या जागा :
जर जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार आपली कर्तव्ये बजावण्यास असमर्थ झाला असेल किंवा कोणत्याही कारणामुळे त्याने आपले पद रिकामे केले असेल किंवा तो आपले अधिकार क्षेत्र सोडून गेला असेल किंवा तो मरण पावला असेल तर -
क)अपर जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी नसल्यास जिल्हयातील सर्वात उच्च दर्जाचा सहायक किंवा उप-जिल्हाधिकारी.
ख) अपर तहसीलदार आणि अपर तहसीलदार नसल्यास नायब तहसीलदार किंवा त्याच्या हाताखाली काम करणारा तालुक्यातील ज्येष्ठतम महसूल अधिकारी.
राज्याने शासनाने इतर तरतूद केली नसेल तर, तात्पुरत्या कालावधीकरिता जिल्हाधिकाऱ्याच्या, किंवा यथास्थिती, तहसिलदारांच्या पदावर येतील आणि जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार आपल्या जिल्हयाचा किंवा तालूक्याचा कार्यभार हाती घेईपर्यंत किंवा उत्तराधिकारी योग्यरित्या नेमण्यात येऊन आपल्या नेमणुकीच्या पदाचा कार्यभार घेईपर्यंत, ते या संहितेअन्वये, जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार असल्याचे समजण्यात येईल.
स्पष्टीकरण :
ज्या अधिकाऱ्याचे प्रमुख पद हे सहायक जिल्हाधिकाऱ्यांच्या पदापेक्षा वेगळे असेल, आणि जो केवळ विशेष प्रयोजनांसाठीच सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम करीत असेल, असा अधिकारी, या कलमाच्या प्रयोजनांसाठी सहायक आहे असे मानण्यात येणार नाही.
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.