महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ९क :
१.(अधिकारांचे प्रत्यायोजन :
राज्य शासनास राजपत्रातील अधिसूचनेद्वारे असा निदेश देता येईल की, निर्देशात विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा महसुली किंवा भूमापन अधिकाऱ्यांच्या संबंधात, निर्दिष्ट करण्यात आलेल्या असतील अशा कोणत्याही शर्तीस अधीन राहून कलम ७, कलम ८ किंवा कलम ९ अन्वये नेमणुका करण्याच्या राज्य शासनाच्या अधिकारांचा वापर, निर्देशात निर्दिष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे, यथास्थिति, जिल्हाधिकारी किंवा भूमि-अभिलेख अधीक्षक यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल अशा अधिकाऱ्याससुध्दा करता येईल.)
---------
१. सन १९६८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३०, कलम २ द्वारे कलम ९ क समाविष्ट करण्यात आले.
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.