महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम १२५ :
पार्डी वा वाडा जमिनीस जमीन महसूल देण्यापासून सूट असणे :
एक-चतुर्थीश एकरापेक्षा अधिक नसेल अशी पार्डी जमीन, आणि शेतीच्या प्रयोजनासाठी किंवा शेतीस दुय्यम किंवा सहाय्यक असलेल्या प्रयोजनासाठीच केवळ वापरण्यात येणारी वाडा जमीन यांस जमीन महसूल देण्यापासून सूट देण्यात येईल;
परंतु, पार्डी जमिनीच्या बाबतीत, ती धारण करण्यात शेतीच्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनासाठी म्हणून जमिनीच्या वापरात बदल केल्याबद्दल, यथास्थिति कलमे ४४,४५ व ६७ अन्वये अकृषिक आकारणी आणि यथास्थिति, दंड देण्यास पात्र ठरेल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम१२५
#MLRCAct1966Marathisection125 #section125MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.