महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २३८ :
सामान्य चौकशी कशी करावी :
या संहितेअन्वये जी चौकशी रीतसर किंवा संक्षिप्त रीतीने करणे आवश्यक नाही, किंवा कोणत्याही महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्यास त्याची कायदेशीर कर्तव्ये बजावण्यासाठी, कोणत्याही प्रसंगी करणे आवश्यक वाटेल ती चौकशी, राज्य शासनाने किंवा अशी चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याने त्यासाठी लागू असणारे जे सामान्य किंवा विशेष नियम विहित केले असतील त्या नियमांनुसार करण्यात येईल व अशा नियमांन्वये ज्या मर्यादेपर्यंत नियंत्रण ठेवण्यात आले असेल त्या मर्यादेस अधीन राहून, आवश्यक त्या वस्तुस्थितीची खात्री करून घेण्यासाठी व सार्वजनिक हित वृध्दिगंत करण्यासाठी जी रीत अधिकाऱ्याच्या मते योग्य असेल त्या रीतीने चालविण्यात येईल.
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.