महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २४१ :
जमिनींवर प्रवेश करण्याचा व भू-मापन करण्याचा अधिकार :
सर्व महसूल आणि भू-संपादन अधिकारी, आणि त्यांच्या देखरेखीखालील व नियंत्रणाखालील त्यांचे नोकर व कामगार यांना तसा निदेश दिला असल्यास जमिनीवर प्रवेश करता येईल व भू-मापन करता येईल आणि सीमा आखता येतील व या संहितेअन्वये किंवा जमीन महसुलाच्या संबंधात त्या त्या वेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही अधिनियमान्वये त्यांच्या पदाशी संबंधित असेलेली इतर कामे करता येतील आणि असे करताना त्यांनी आपली कर्तव्ये योग्य रीतीने बजावण्यासाठी जरूर असेल त्यापेक्षा अधिक नुकसान ते होऊ देणार नाहीत ;
परंतु, कोणतीही व्यक्ती कोणत्याही इमारतीमध्ये किंवा राहत्या घरात संलग्न अशा कुंपण घातलेल्या आवारत किंवा बागेत, तेथे राहाणाऱ्यांची संमती घेतल्याशिवाय व सदरहू राहणाऱ्यास कमीत कमी चोवीस तासांची पूर्वसूचना दिल्याशिवाय, प्रवेश करणार नाही. आणि अशा रीतीने प्रवेश करताना तेथे राहणाऱ्यांच्या सामाजिक व धार्मिक भावनांना योग्य तो मान देण्यात येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२४१
#MLRCAct1966Marathisection241 #section241MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.