महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २४६क :
१.(भोगवटादार-वर्ग एक चे हक्क बहाल करण्यासाठी प्रलंबित असलेले अर्ज :
भोगवटादार-वर्ग एक म्हणून जमीन धारण करण्याबाबतचा परवानगीकरिता, २१ एप्रिल २०१८ रोजी म्हणजेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) आणि महाराष्ट्र जमीन महसूल (विवक्षित भूमिधारींचा भोगवटादार-वर्ग एक मध्ये अंतर्भाव करण्यासाठी परवानगी देण्याबाबत) नियम (निरसन) अधिनियम २०१८ याच्या प्रारंभाच्या दिनांकास, कोणत्याही महसूल अधिकाऱ्यापुढे किंवा राज्य शासनापुढे कोणत्याही व्यक्तीचा प्रलंबित असलेला कोणताही अर्ज, मग तो अपील अर्ज, पुनरीक्षण अर्ज किंवा अन्य अर्ज असो, उक्त अधिनियमाच्या प्रारंभाच्या दिनांकापासून संपुष्टात आला आहे, असे समजण्यात येईल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनाथ, जमीन या शब्दप्रयोगाचा अर्थ, हक्क हस्तांतरण करण्याच्या हक्कावरील निर्बंधासह भूमिस्वामी हक्कान्वये विदर्भातील कोणत्याही स्थानिक क्षेत्रात किंवा भूमिधारी हक्कान्वये विदर्भातील कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, धारण केलेली जमीन, असा असेल.)
---------
१. सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४४ याच्या कलम ३ द्वारा समाविष्ट करण्यात आले.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२४६क
#MLRCAct1966Marathisection246A #section246aMLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.