महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २४७ :
अपील व अपील अधिकारी :
१)या संहितेत किंवा त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये एतद्विरूध्द कोणताही स्पष्ट तरतूद नसेल तेव्हा, या संहितेअन्वये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये, अनुसूची ड च्या स्तंभ (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या महसूल किंवा भू-मापन अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही निर्णयाविरूध्द किंवा आदेशाविरूध्द, त्या अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिकाऱ्यांकडे अपील करण्यात येईल- मग असा निर्णय किंवा आदेश उक्त अनुसूचीच्या स्तंभ (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूध्द किंवा आदेशाविरूध्द केलेल्या अपिलावर दिलेला असो किंवा नसो;
परंतु, कोणत्याही परिस्थितीमध्ये अपिलांची संख्या दोनपेक्षा जास्त होणार नाही.
२)जेव्हा पदोन्नतीमुळे किंवा पदनामात बदल झाल्यामुळे, या कलमान्वये कोणत्याही निर्णयाविरूध्द किंवा आदेशविरूध्द करावयाचे अपील हे, ज्याविरूध्द अपील केले असेल, तो निर्णय किंवा आदेश ज्या अधिकाऱ्याने दिला असेल त्याच अधिकाऱ्याकडे करावे लागत असेल तेव्हा असे अपील संहितेच्या तरतूदींन्वये ते ज्याच्याकडे हस्तांतरित करता येईल अशा, त्या अपिलाचा निर्णय करण्यास सक्षम असलेल्या इतर अधिकाऱ्याकडे करण्यात येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२४७
#MLRCAct1966Marathisection247 #section247MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.