महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
जमीन महसुलाची आकारणी व वसुली :
कलम २६२ :
१.(जमीन महसुलाची आकारणी निश्चित करण्याचा व ती बसविण्याचा जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार :
१)पोट-कलम (२) आणि पोट-कलम (३) यांच्या तरतुदींना अधीन राहून जमीन महसुलाची आकारणी निश्चित करणे व ती बसविणे हे जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य असेल.
२)राज्य शासनाचा आकारणी करण्याचा अधिकार मर्यादित करणारा कोणताही अधिकार वरिष्ठ दर्जाच्या धारकाला नसेल त्याबाबतीत, शहर भू-धारणापध्दती नाहीशी करण्याबाबत अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, या प्रकरणानुसार आकारणी निश्चित करण्यात येईल.
३)कायम करण्यात व परिरक्षण करण्यात आलेल्या आणि शहर भू-धारणपध्दती नाहीशी करण्याबाबत अधिनियमान्वये नाहीशा न केलेल्या विनिर्दिष्ट मर्यादेचा परिणाम म्हणून राज्य शासनाचा आकारणी करण्याचा अधिकार मर्यादित करणारा अधिकार वरिष्ठ धारकाला असेल त्याबाबतीत आकारणी अशा विनिर्दिष्ट मर्यादेपेक्षा अधिक असणार नाही. )
----------
१.सन १९६९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४४ कलम २० च्या दुसऱ्या अनुसूची अन्वये कलम २६२ दाखल करण्यात आले.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२६२
#MLRCAct1966Marathisection262 #section262MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.