महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २६२ड :
हमीची मुदत :
१)कलम २६२-क मध्ये उल्लेखिलेल्या बँकेच्या व्याजाच्या दरात कोणताही फेरफार झाला असला तरीही किंवा आकारणीच्या प्रमाणभूत दराची सुधारणा करण्यात आली असली तरीही, या प्रकरणान्वये कोणत्याही जमिनीसंबंधात निश्चित केलेली आकारणी, ती ज्या दिनांकास निश्चित केली असेल त्या दिनांकापासून पन्नास वर्षाच्या मुदतीकरिता (अशा मुदतीस हमीची मुदत म्हणता येईल ) अंमलात राहील.
२)हमीची मुदत संपल्यानंतर आकारणी सुधारणा केली जाण्यास पात्र होईल ; आणि या प्रकरणाच्या पूर्ववर्ती तरतुदी जेथवर शक्य असतील तेथवर अशा सुधारणेस लागू होतील.
३)आकारणीची अशा रीतीने सुधारणश करण्यात येईपर्यंत, केलेली आकारणी, हमीची मुदत संपली असली तरीही, अंमलात राहील.)
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.