महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २६७ :
थकबाकीची रक्कम देय झाल्यानंतर मागणीची नोटीस बजावणे :
१)जर कोणताही जमीन महसूल तो जेव्हा देय होईल त्यावेळी किंवा त्या मुदतीत देण्यात आला नाही तर, जिल्हाधिकाऱ्याला, ज्या दिवशी थकबाकीची रक्कम देय होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवसानंतर, मागणीची नोटीस वरिष्ठ धारकावर किंवा ताबा असणाऱ्या व्यक्तींवर किंवा या दोघांवर बजाविता येईल.
२)ज्या कोणत्याही व्यक्तीला अशी नोटीस देण्यात आली असेल अशा प्रत्येक व्यक्तीवर, त्याबद्दल जास्तीत जास्त दोन रूपयांची, अनुसूची च मधील कोष्टकात या बाबतीत विनिर्दिष्ट केलेल्या दरानुसार ठरविलेली १.(किंवा विहित करण्यात येईल अशा अधिकतम रकमेइतकी, यांपैकी जी रक्कम अधिक असेल त्या रकमेइतकी) फी आकारण्यात येईल ;
परंतु, कोणत्याही बाबतीत नोटिशीबद्दल आकारण्यात येणारी फी उक्त जमीन महसुलाच्या बाबतीत देण्यात आली असेल त्या जमीन महसुलापेक्षा अधिक असणार नाही.
३)जर वरिष्ठ धारक किंवा, यथास्थिति, ताबा असणारी व्यक्ती, रक्कम देण्याविषयी मागणीची लेखी नोटीस बजावण्यात आल्यानंतर वीस दिवसांच्या मुदतीत देय महसुलाची फेड करण्यात कसूर करील तर, जिल्हाधिकाऱ्याने -
क)कसूर करणाऱ्याची जंगम मालमत्ता जप्त करून व विकून ; किंवा
ख)ज्या जमिनीबाबत महसूल देय असेल त्या जमिनीचा, मागणी पूर्ण करण्यासाठी आवश्यक असेल असा भाग जप्त करून व विकून ; किंवा
ग)कसूर करणाऱ्याच्या इतर कोणत्याही स्थावर मालमत्तेवरील त्याचा हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध जप्त करून व विकून;
उक्त महसूल वसूल करणे हे कायदेशीर असेल.
अशी विक्री जाहीर लिलावाद्वारे करण्यात येईल आणि अशी विक्री त्याबद्दलची नोटीस राजपत्रात प्रसिध्द केल्यानंतर, निदान पंधरा दिवसांची मुदत संपेपर्यंत करण्यात येणार नाही.
---------
१. सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम १८ द्वारा समाविष्ट केले.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२६७
#MLRCAct1966Marathisection267 #section267MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.