महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २९७ :
नोटिशीचा नमुना :
१)अनुसूची ज किंवा, यथास्थिति, अनुसूची झ च्या नमुन्यात नोटीस असेल आणि तीत उक्त नमुन्यान्वये आवश्यक असलेला सर्व तपशील स्पष्टपणे लिहिलेला असेल.
२)जिल्हाधिकाऱ्यास तसे फर्माविणे योग्य आहे असे वाटत असेल तेव्हा, अशा नोटिशीबरोबर, अशा हस्तांतरणाचा लेख असल्यास तो लेख, ज्या जमिनीचे हस्तांतरण किंवा अभिहस्तांकन करावयाचे असेल त्या जमिनीचा जो नकाशा जिल्हाधिकारी निदेश देईल अशा अधिकाऱ्याने काढला असेल आणि त्याच्या खरेपणाबद्दल सही केली असेल तो नकाशा आणि दवंडी पिटवून अशा हस्तांतरणाबद्दल किंवा अभिहस्तांकनाबद्दल जाहीर नोटीस दिली असल्याबद्दलचे प्रमाणपत्र, पाठविले पाहिजे.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२९७
#MLRCAct1966Marathisection297 #section297MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.