महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
जमिनी वगैरेचे हस्तांतरण :
कलम २९६ :
जमिनीवगैरेच्या मालकीहक्काच्या हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यास नोटीस देणे :
१)राज्य शासनास जमीन महसुल देण्यास अधीन असलेलया कोणत्याही जमिनीचा, घराचा किंवा इतर स्थावर मालमत्तेचा मालकी हक्क जेव्हा जेव्हा हस्तांतरित किंवा अभिहस्तांकित करण्यात येईल तेव्हा तेव्हा, असे हस्तांतरण करणारी किंवा अभिहस्तांकन करणारी व्यक्ती आणि ज्या व्यक्तीकडे ते हस्तांतरीत करण्यात किंवा अभिहस्तांकित करण्यात आले असेल ती व्यक्ती, यांनी अनुक्रमे अशा हस्तांतरणाबद्दल जिल्हाधिकाऱ्याला नोटीस देण्याची व्यवस्था केली पाहिजे.
२)अशी नोटीस, हस्तांतरणाचा किंवा अभिहस्तांकनाचा लेख केल्यानंतर किंवा त्याची नोंदणी केली असेल तर नोंदणीनंतर किंवा लेख नसेल तर ते हस्तांतरण किंवा अभिहस्तांकन अंमलात आल्यानंतर, वीस दिवसांच्या आत देण्यात येईल.
३)ज्या कोणत्याही व्यक्तीचे नाव कोणत्याही मालमत्तेच्या मालकी हक्कासंबंधात जिल्हाधिकाऱ्याच्या अभिलेखात दाखल केलेले असेल ती व्यक्ती मरण पावल्यास ज्या व्यक्तीकडे अशा मालकीहक्क वारस म्हणून किंवा इतर रीतीने हस्तांतरित करण्यात येईल त्या व्यक्तीने त्याबाबतची नोटीस असा मृत्यू झाल्यापासून एक वर्षांच्या आत जिल्हाधिकाऱ्यास देण्याची व्यवस्था केली पाहिजे.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२९६
#MLRCAct1966Marathisection296 #section296MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.