महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३०० :
नोंदीबद्दल किंवा हस्तांतरणाबद्दल वाद असल्यास कार्यवाही :
१)राज्य शासनास जमीन महसूल देण्यास पात्र असलेल्या कोणत्याही जमिनीच्या, घराच्या किंवा इतर स्थावर मालमत्तेच्या बाबतीत किंवा त्या संबंधात, जिल्हाधिकाऱ्याच्या अभिलेखात करावयाच्या किंवा केलेल्या कोणत्याही नोंदीबाबत किंवा हस्तांतरणाबाबत कोणताही वाद किंवा प्रश्न उपस्थित करण्यात येईल तेव्हा, जिल्हाधिकारी, अशा नोंदीत किंवा हस्तांतरणात हितसंबंध असलेल्या सर्व पक्षकारांना, समन्स काढून बोलाविल, त्यास आवश्यक वाटेल असा पूरावा मागवील, अशा साक्षीदारांची तपासणी करील आणि त्यानंतर तो अशा जमिनीच्या, घराच्या किंवा इतर स्थावर मालमत्तेच्या संबंधात आपल्या अभिलेखात कोणत्या नोंदी करण्यात येतील ते संक्षिप्त रीतीने चौकशी करून ठरवील.
२)अशा कोणत्याही जमिनीचा, घराचा किंवा इतर स्थावर मालमत्तेच्या मालकीहक्क ठरविण्याबाबत सक्षम न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रमाणित प्रत जर कोणत्याही वेळी जिल्हाधिकाऱ्यास सादर करण्यात येईल तर जिल्हाधिकारी अशा आदेशास अनुसरून आपल्या अभिलेखात सुधारणा करील.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३००
#MLRCAct1966Marathisection300 #section300MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.