महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
प्रकरण सोळा :
संकीर्ण :
कलम ३२७ :
नकाशे आणि जमिनीसंबंधीचे अभिलेख तपासणी, इत्यादीसाठी खूले असणे :
राज्य शासन या बाबतीत वेळोवेळी विहित करील अशा नियमांना अधीन राहून आणि अशी फी दिल्यावर, सर्व नकाशे आणि जमिनीसंबंधीचे अभिलेख, लादण्यात येतील अशा निर्बंधास अधीन राहून, वाजवी वेळात लोकांच्या तपासणीसाठी खुले असतील आणि त्यातील प्रमाणित उतारे किंवा त्यांच्या प्रमाणित प्रती, त्यासाठी अर्ज करणाऱ्या सर्व व्यक्र्तीस देण्यात येतील.
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.