महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ कलम ३२८ : नियम :
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
प्रकरण सोळा :
संकीर्ण :
कलम ३२८ :
नियम :
१)राज्य शासनास या संहितेच्या तरतुदी अमलात आणण्याच्या कारणासाठी म्हणून, या संहितेच्या तरतुदींशी विसंगत नसतील असे नियम करता येतील.
२)विशेषत: आणि उपरिनिर्दिष्ट तरतुदींच्या सामान्यतेस बाध न आणता, अशा नियमांत पुढीलपैकी एक किंवा सर्व बाबींची तरतुद करता येईल :-
(एक) कलम १३, पोट-कलम (१) अन्वये महसूल अधिकाऱ्यांस बजावणी करता येईल असे अपील, अधीक्षण व नियंत्रण याबाबतीतील इतर अधिकार व कर्तव्ये;
(दोन) कलम १४, पोट-कलम (२) अन्वये मंडळ अधिकाऱ्यास आणि मंडल निरीकास तलाठयावर ज्या अधिकारांचा वापर करता येईल ते अधिकार आणि त्यांस जी कर्तव्ये व कामे पार पाडता येतील ती कर्तव्ये व कामे ;
(तीन)कलम १५ अन्वये ज्यांना अधिकार प्रदान करण्यात येतील अशा व्यक्तींच्या अर्हता;
(चार) कलम २०, पोट-कलम (१) अन्वये राज्य शासनाच्या मालमत्तेचा विनियोग करण्याची रीत आणि पोट-कलम (५) अन्वये नोटीस देण्याकरिता करावायाचे नियम ;
(पाच) कलम २३ अन्वये मोफत कुरणांत गुरे चारण्याच्या हक्कांचे नियमन करणारे नियम ;
(सहा) कलम २५, पोट-कलम (१) अन्वये विवक्षित झाडे कापण्यावर प्रतिबंध घालणारे किंवा त्याचे नियमन करणारे नियम; पोट-कलम (२) अन्वये, झाडांवरील हक्काचे मूल्य ठरविण्यासाठी भोगवटदारास ज्या रितीने जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करता येईल आणि अशा हक्काची खरेदी करता येईल ती रीत;
(सात) कलम २६ अन्वये, शासनाकडे निहित असलेली झाडे, झुडपे, जंगल किंवा इतर नैसर्गिक उत्पन्न ज्या रीतीने जतन करण्यात येईल किंवा त्याचा विनियोग करण्यात येईल ती रीत ;
(आठ) कलम २८, पोट-कलम (१) अन्वये ज्या नियमांना अधीन राहून, कोणताही कर न देता सरपण नेता येईल ते नियम; आणि पोट-कलम (२) अन्वये, विशेषाधिकारांच्या वापराचे नियमन करणारे नियम;
१.(*)
(दहा) कलम ३१ अन्वये किंमत देणे, लिलाव आणि बिनदुमाला जमीन देण्यासंबंधातील शर्ती यांच्या तरतुदीसह अशी जमीन देण्याबाबत नियम;
(अकरा) कलम ३२, पोट-कलम (१) अन्वये ज्या नियमांना अधीन राहून जलोढ जमिनीचा विनियोग करण्यात येईल ते नियम;
(बारा) कलम ३५,पोट-कलम (२) अन्वये ज्या नियमांना अधीन राहून जिल्हाधिकाऱ्याकडून पोट-विभागाच विनियोग करण्यात येईल ते नियम;
(तेरा) कलम ३६, पोट-कलम (३) अन्वये ज्या नियमांस अनुसरून जिल्हाधिकाऱ्यास जमीन महसुलाची थकबाकी किंवा इतर कोणत्याही येणे असलेल्या रकमा याबद्दलची दायित्वे ठरविता येतील ते नियम आणि ज्या कार्यपध्दतीस अनुसरून त्यास भोगवटा मिळविण्याबद्दलचे अर्ज निकालात काढता येतील ती कार्यपध्दती; आणि त्या कलमाच्या पोट-कलम (४) अन्वये द्यावयाचे पट्टामूल्य (प्रिमियम );
(चौदा) कलम ३८ अन्वये ज्या नियमांना अधीन राहून, जिल्हाधिकाऱ्यास कोणतीही बिनदुमाला भोगवट्यात नसलेली जमीन अनुदानपत्राअन्वये किंवा संविदेअन्वये पट्टयाने देता येईल ते नियम;
२.(चौदा-क) कलम ४१ अन्वये शेतावरील इमारत उभारण्यासाठी किंवा तिचे नवीकरण, पुनर्बांधणी, तीमध्ये फेरफार किंवा भर घालण्याचे काम पार पाडण्यासाठी परवानगी मागण्याकारिता करावयाच्या अर्जाचा नमुना ; आणि ज्यांस अधीन राहूून जिल्हाधिकारी अशी परवानगी देईल त्या अटी व शर्ती; )
३.(चौदा-कक) कलम ४२ च्या पोटकलम (२) अन्वये, ज्या नमुन्यामध्ये (फॉर्ममध्ये) व्यक्तीने जमिनीचा वापर सरु केला त्या तारखेची माहिती द्यावी आणि इतर माहिती द्यावी.)
(पंधरा) कलम ४३ अन्वये, ज्या नियमांना अधीन राहून, जिल्हाधिकाऱ्यास किंवा भू-मापन अधिकाऱ्यास, इतर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर करण्यास प्रतिबंध करता येईल आणि जो अशा रितीने प्रतिबंध करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी अशा जमिनीचा वापर करील त्या धारकास संक्षिप्त चौकशी करून काढून टाकता येईल ते नियम;
(सोळा) कलम ४४, पोट-कलम (१) अन्वये जमिनीचा इतर कारणासाठी वापर करण्यास परवानगी मिळण्याबद्दल करावयाच्या अर्जाचा नमुना ;पोट-कलम (२), खंड (ग) अन्वये ज्या नियमांना अधीन राहून जमिनीचा इतर कारणांसाठी वापर करण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्याकडून देण्यात येईल ते नियम; आणि पोट-कलम (३) अन्वये ज्या शर्तीना अधीन राहून जमिनीचा इतर कारणासाठी वापर करण्याची परवानगी देण्यात आल्याचे समजण्यात येईल त्या शर्ती ; कलम ४४ पोट-कलम (५) अन्वये कसूर करणारी व्यक्ती देण्यास पात्र असले असा दंड विहित करणारे नियम; आणि त्या कलमाच्या पोट-कलम (६) अन्वये वसाहत प्रकल्पासाठी वापर ) करणारी व्यक्ती जमिनीच्या वापरातील बदलास प्रारंभ झाल्याच्या दिनांकाची सूचना व इतर माहिती ज्या नमुन्यात देईल तो नमुना ; आणि कलम ४४-क, पोट-कलम (३) खंड (क) च्या उपखंड (एक) अन्वये, तहसीलदाराकडे सूचना पाठविण्यात झालेल्या कसुरीबद्दल जिल्हाधिकाऱ्याला ज्या नियमांना अधीन राहून शास्ती बसवता येईल ते नियम; आणि कलम ४४-क पोट-कलम (५) खालील सनदेचा नमुना ;
४.(सोळा-क) कलम ४४-क, पोट-कलम (२) अन्वये, जमिनीचा खराखुर औद्योगिक वापर ५.(किंवा एकात्मीकृत नगर वसाहत प्रकल्पासाठी वापर) करणारी व्यक्ती जमिनीच्या वापरातील बदलास प्रारंभ झाल्याच्या दिनांकाची सूचना व इतर माहिती ज्या नमुन्यात देईल तो नमुना; आणि कलम ४४-क पोट-कलम (३), खंड (क) च्या उपखंड (एक) अन्वये, तहसीलदाराकडे सूचना पाठविण्यात झालेल्या कसुरीबद्दल जिल्हाधिकाऱ्याला ज्या नियमांना अधीन राहून शास्ती बसवता येईल ते नियम; आणि कलम ४४-क च्या पोट-कलम (५) खालील सनदेचा नमुना;)
(सतरा) कलम ४५, पोट-कलम (१) अन्वये परवानगीशिवाय जमिनीचा वापर केल्याबद्दलची शास्ती म्हणून द्यावयाचा दंड विहित करणारे नियम;
(अठरा) कलम ४७ अन्वये जिल्हाधिकाऱ्यास ज्या नियमांना अधीन राहून कोणत्याही जमिनीचा अकृषिक वापर नियमात बसविता येईल ते नियम;
६.(एकोणीस) कलम ४८ च्या पोटकलम (८) अन्वये गौण खनिजे अनधिकृतपणे काढण्यासाठी, हलविण्यासाठी, गोळा करण्यासाठी, दुसèया जागी नेण्यासाठी, उचलून घेण्यासाठी किंवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली यंत्रसामग्री, साधनसामग्री, किंवा वाहतुकीची साधने सोडून देण्याकरिता, मालकाकडून प्रदान करण्यात यावयाची शास्ती विहित करण्यासाठीचे नियम; आणि उक्त कलम ४८ च्या पोटकलम (९) अन्वये गौण खनिजे काढणे व ते काढून नेणे या गोष्टींचे नियमन करण्यासाठीचे नियम;)
(वीस) कलम ४९ पोट-कलम (१) अन्वये ज्या नमुन्यात अर्ज करण्यात आला पाहिजे तो नमुना ;
(एकवीस) कलम ५१ अन्वये अतिक्रमण करणाऱ्यास ज्या नियमांना अधीन राहून जमीन देण्यात येईल ते नियम;
(बावीस) कलम ६० अन्वये ज्या स्थानिक क्षेत्रात कलम ५५ ची अंमलबजावणी तहकूब ठेवण्यात येईल ते स्थानिक क्षेत्रे ;
(तेवीस)कलम ६६ अन्वये, पाण्याने धुपून गेलेली जमीन पूर्ववत प्राप्त झाल्यानंतर जमीन महसूल देण्यास ज्या नियमांना अधीन राहून जमीनधारक पात्र होईल ते नियम धरून, ज्या नियमांना अधीन राहून भूमिधारकास आकारणी कमी करण्याचा हक्क प्राप्त होईल ते नियम;
(चोवीस) कलम ६७, पोट-कलम (४) अन्वये ज्या नियमांस अनुसरून त्या कलमाची पोट-कलमे (२) आणि (३) अन्वये आकारणी करता येईल ते नियम;
(पंचवीस) कलम ६८ पोट-कलम (१) अन्वये ज्या नियमांना अधीन राहून, जिल्हाधिकाऱ्याकडून महसूल म्हणून द्यावयाच्या रकमेची आकारणी करण्यात येईल ते नियम;
(सव्वीस )कलम ७२ अन्वये ज्या नियमांना अधीन राहून भोगवटयाचा किंवा दुमाला जमिनीचा विनियोग करता येईल ते नियम;
(सत्तावीस) कलम ७५ अन्वये ठेवण्यात यावयाच्या दुमाला जमिनींच्या नोंदवहीचा नमुना, त्या नोंदवहीतील प्रमाणित उतारे ज्या नियमांना अधीन राहून देता येतील ते नियम आणि त्यासाठी आकारावयाची फी;
(अठ्ठावीस) कलम ७८ अन्वये ज्या नियमांस अनुसरून, कोणत्याही क्षेत्रात, जमीन महसूल कमी करण्यात, तहकूब करण्यात किंवा त्यापासून माफी देण्यात येईल ते नियम.
(एकोणतीस) कलम ८४ अन्वये ज्या नियमांनुसार क्षेत्राचे आणि भूमापन क्रमांकांच्या व त्याच्या पोट-विभागांच्या आकारणीचे अभिलेख ठेवण्यात येतील, ते नियम;
(तीस) कलम ८५ अन्वये ज्या नियमांनुसार जिल्हाधिकाऱ्यास धारण जमिनीचे विभाजन करता येईल व तिच्यावरील आकारणीची वाटणी करता येईल ते नियम; ७.(*)
(एकतीस) कलम ८७ च्या पोट-कलम (१) अन्वये ज्या नियमांनुसार भूमापन क्रमांकाची पोट-विभागात विभागणी करण्यात येईल आणि पोट-विभागांची आकारणी निश्चित करण्यात व सुधारण्यात येईल ते नियम; आणि ज्या भूमि अभिलेखात क्षेत्र व अशा पोट-विभागांची आकारणी नमूद करण्यात येईल ते भूमि अभिलेख;
(बत्तीस) कलम ९०, खंड (च) अन्वये सोळा आणे वर्गीकरणानुरूप घटक साधन प्रमाणातील जमिनीच्या प्रकारांची संख्या;
(तेहतीस) कलम ९४, पोट-कलम (१) अन्वये गट बनविण्याकरिता जमिनी विभागण्यासाठी आणि प्रत्येक गटासाठी प्रमाण दर ठरविण्यासाठी नियम; आणि पोट -कलम (३) अन्वये प्रत्येक भू-मापन क्रमांक व पोट-विभाग यांच्या वर्गीकरण किंमतीच्या आधारे जमाबंदी अधिकारी त्यांची ज्या रीतीने जमीन महसुलाची आकारणी निश्चित करील ती रीत;
(चौतीस) कलम ९६ अन्वये, जमाबंदीच्या प्रयोजनासाठी जमिनीच्या पिकांचे सरासरी उत्पन्न निश्चित करण्याची आणि त्या प्रयोजनासाठी चौकशी करण्याची रीत आणि जिल्हाधिकाऱ्यास प्रतिवृत्त सादर करण्याची रीत;
(पस्तीस) कलम ९७ अन्वये ज्या रीतीने जमाबंदीचे प्रतिवृत्त प्रसिध्द करण्यात येईल ती रीत;
(छत्तीस ) कलम ९९ अन्वये अनामत ठेवावयाची खर्चाची रक्कम, ८.(न्यायाधिकरणाकडून) ज्या रीतीने चौकशी करण्यात येईल ती रीत; आणि खर्चाची रक्कम परत करण्यासाठी नियम;
(सदतीस) कलम १०२ अन्वये नोटीस देण्याची रीत;
९.(सदतीस - क) कलम १०८ अन्वये भांडवलीकृत आकारणीची रक्कम ठरवण्याची रीत;)
(अडतीस) कलम ११३ अन्वये जमिनींच्या संपूर्ण बाजार मूल्याची टक्केवारी आणि निश्चित केलेल्या किंवा सुधारणा केलेल्या अकृषिक आकारणीचे प्रमाण दर ज्या रीतीने प्रसिध्द करण्यात येतील ती रीत; आणि ज्या रीतीने पूर्ण बाजार मूल्याचा अंदाज करण्यात येईल ती रीत;
(एकोणचाळीस) कलम ११७ अन्वये, खंड (१) अन्वयेचे इतर व्यवसाय आणि खंड (५) अन्वयेची मुदत व शर्ती;
(चाळीस) कलम १२७ च्या पोट-कलम (२) अन्वये ज्या नियमांस अनुसरून जिल्हाधिकाऱ्याकडून भू-मापन फीच्या रकमेचे नियमन करण्यात येईल ते नियम;
(एकेचाळीस) कलम १२६ अन्वये केलेल्या कामाची ज्या रीतीने आणि ज्या नकाशात व नोंदवहीत कलम १२८ अन्वये नोंद करण्यात येईल ती रीत व ते नकाशे व त्या नोंदवह्या; आणि असे नकाशे तयार करण्याच्या खर्चासाठी ग्रामपंचायतीने द्यावयाच्या अंशदानाचे प्रमाण;
(बेचाळीस) कलम १३१ अन्वये सनदेची प्रत देण्यासाठीचे आकार किंवा फी;
(त्रेचाळीस) कलम १३६ च्या पोट-कलम (२) अन्वये, एखाद्या भू-मापन क्रमांकाच्या किंवा पोट-विभागाच्या सीमांची आखणी करण्यासंबंधातील जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यपध्दतीचे नियमन करण्यासाठीचे नियम आणि वापरण्यात येणाऱ्या सीमा चिन्हांचे स्वरूप आणि जमिनधारकावर फीची आकारणी करण्यास प्राधिकार देणे;
(चव्वेचाळीस) कलम १३७ अन्वये परियोजना, योजना आणि ज्या नियमांना अधीन राहून, पोट-कलम (२) अन्वये भू-मापन अधिकाऱ्याकडून सीमांची फेर आखणी करण्यात येईल ते नियम प्रसिध्द करण्याची रीत आणि ग्राम समितीसाठी आवश्यक असलेल्या सदस्यांची संख्या आणि कलम १३७ च्या पोट-कलम (४) अन्वये ज्या रीतीने त्या समितीची निवड करण्यात येईल ती रीत;
(पंचेचाळीस) कलम १३९ अन्वये, ज्या नियमांना अधीन राहून भूमि अभिलेख अधीक्षकास सीमा चिन्हांचे व भू-मापन चिन्हांचे वर्णन निश्चित करता येईल ते नियम आणि ज्या रीतीने त्या तयार करण्यात येतील, लावण्यात येतील, त्या सुस्थितीत ठेवण्यात येतील किंवा त्यांची दुरूस्ती करण्यात येईल ती रीत व त्या कलमाच्या पोट-कलम (३) अन्वये अशा सीमा चिन्हांचे व भूमापन चिन्हांचे आकार व त्यांची सामग्री ठरविणे;
(सेहेचाळीस) कलम १४२ अन्वये सीमा आखण्याची आणि त्याच्या पोट-कलम (१) अन्वये सीमा चिन्हांची दुरूस्ती करण्याची व त्यांचे नवीकरण करण्याची रीत;
(सत्तेचाळीस ) कलम १४८ अन्वये जी इतर तपशील अधिकाराभिलेखात समाविष्ट असेल, असा त्या कलमाच्या खंड (ड) अन्वयेचा इतर तपशील;
(अठ्ठेचाळीस ) कलम १४९ च्या तिसऱ्या परंतुकान्वये तरतुद केल्याप्रमाणे ज्या आदेशान्वये परवानगी देण्यात आली असेल त्या आदेशाबाबतचा आवश्यक तो पुरावा सादर करण्यासाठीचे नियम;
(एकोणपन्नास) कलम १५०, पोट-कलम (३) अन्वये तलाठयाने द्यावयाच्या पोचपावतीचा नमुना, पोट-कलम (४) अन्वये फेरफार नोंदवहीत आक्षेप निकालात काढण्यासंबंधातील आदेशाची ज्या रीतीने नोंद करण्यात येईल ती रीत, पोट-कलम (५) अन्वये ज्या नियमांना अधीन राहून, फेरफार नोंदवहीतील नोंदी अधिकाराभिलेखात दाखल करण्यात येतील ते नियम, पोट-कलम (६) अन्वये ज्या रीतीने फेरफार नोंदवहीतील नोंदी प्रमाणित करण्यात येतील ती रीत आणि त्या कलमाच्या पोट-कलम (७) अन्वये कुळवहिवाटीची नोंदवही ठेवण्यासंबंधात अनुसरावयाची रीत आणि कार्यपध्दती;
(पन्नास) कलम १५१, पोट-कलम (४) अन्वये पुस्तिकेत असावयास पाहिजेत अशा इतर बाबी; आणि पोट-कलम (५) अन्वये ज्या नियमांस अनुसरून पुस्तिका तयार करण्यात येईल, देण्यात येईल व ठेवण्यात येईल ते नियम आणि त्यासाठी आकारावयाची फी;
(एकावन्न) कलम १५३ च्या प्रयोजनासाठी असलेले नियम;
(बावन्न) कलम १५४ अन्वये, ज्या नमुन्यात आणि ज्यावेळी, नोंदणी अधिकाऱ्याकडून हस्तांतरणांसंबंधीची माहिती कळविण्यात येईल तो नमुना व ती वेळ ;
(त्रेपन्न) कलम १५६ अन्वये तयार करावयाचे इतर भूमि अभिलेख;
(चौपन्न) कलम १७० च्या पोट-कलम (२) अन्वये, जमीन महसूल हप्त्यांनी देण्याची तरतूद करणारे आणि ज्या दिनांकास, ज्यांच्याकडे व ज्या ठिकाणी असे हप्ते देण्यात येतील असे दिनांक, अशा व्यक्ती व अशी ठिकाणे, विहित करणारे नियम;
(पंचावन्न) कलम १७९ अन्वये, ज्या नियमांना अधीन राहून सरकारजमा झालेले भोगवटयाचे अधिकार किंवा दुमाला जमिनी विकण्यात येतील किंवा अन्यथा त्याचा विनियोग करण्यात येईल ते नियम;
(छपन्न) कलम १८७ अन्वये बिनदुमाला जमिनीच्या व्यवस्थापनासाठी नियम;
(सत्तावन्न) कलम १९२, पोट-कलम (१) अन्वये जिल्हाधिकाऱ्याने काढावयाच्या घोषणेचा नमुना ;
(अठठावन) कलम १९३, पोट-कलम (४) खालील नोटिशीचा नमुना ;
(एकोणसाठ) कलम २०५ अन्वये ज्या रीतीने मालमत्तेच्या फेरविक्रीची नवीन नोटीस देण्यात येईल ती रीत;
(साठ) कलम २३८ अन्वये सामान्य चौकशी करण्यासाठीचे नियम ;
(एकसष्ठ) कलम २३९ अन्वये प्रत काढणे, शोधणे तपासणी करणे आणि तत्सम इतर बाबी यासाठीचे आकार;
(बासष्ट) कलम ३२७ अन्वये ज्या नियमांना अधीन राहून आणि जी फी दिल्यावर, नकाशे आणि अभिलेख हे लोकांच्या तपासणीसाठी खुले असतील आणि त्यातील प्रमाणित उतारे किंवा त्यांच्या प्रमाणित प्रती देण्यात येतील ते नियम आणि ती फी ;
(त्रेसष्ट) या संहितेअन्वये ज्या बाबीसाठी नियम करता येतील अशी इतर कोणतीही बाब.
---------------
१. सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४४ याच्या कलम ४ द्वारा खंड नऊ वगळण्यात आला.
(नऊ) कलम २९, पोट-कलम (२), खंड (ग) अन्वये ज्या नियमांना अधीन राहून भूमिधारींना भोगवटदारांच्या वर्ग एक मध्ये समाविष्ट करण्यास परवानगी देण्यात येईल ते नियम;
२. सन १९८६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२, कलम ४ अन्वये खंड (चौदा-क) समाविष्ट करण्यात आला.
३. सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९ याच्या कलम ३ द्वारे समाविष्ट केले.
४.सन १९९४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २६, कलम ४ अन्वये खंड (चौदा-क) समाविष्ट करण्यात आला.
५. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १९ याच्या कलम ३ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
६. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २७ याच्या कलम ३ द्वारा खंड (एकोणीस) ऐवजी समाविष्ट केले.
(एकोणीस) कलम ४८, पोट-कलम(९) अन्वये गौण स्वरूपाचे खनिज पदार्थ काढणे व ते काढून नेणे या गोष्टींचे नियमन करण्यासाठी नियम;
७.सन १९७० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४ याच्या कलम ६ द्वारे आणि क्षेत्राच्या किंवा जमीन महसुलाच्या ज्या मर्यादाखाली विभागणी करण्याचे नाकारता येईल त्या मर्यादा हा मजकूर वगळण्यात आला.
८. सन २००७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २३ याच्या कलम ११ द्वारा मूळ मजकुराऐवजी समाविष्ट केले.
९.सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३५, कलम ४ अन्वये हा खंड समाविष्ट करण्यात आला.
INSTALL IOS / Iphone App
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
No feedback yet
Form is loading...