महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम ३२९ :
नियम आगाऊ प्रसिध्द करणे आणि नियमांचा भंग केल्याबद्दल शास्ती यासाठी तरतुद :
१)या संहितेअन्वये केलेले सर्व नियम आगाऊ प्रसिध्द करण्याच्या शर्तीस अधीन असतील.
२)या संहितेअन्वये कोणतेही नियम करताना, राज्य शासनाने असे विहित करणे कायदेशीर असेल की, उक्त नियमांचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती अशा उल्लंघनातून निर्माण होणाऱ्या इतर कोणत्याही परिणामांबरोबरच जिल्हाधिकाऱ्यास तिचे म्हणणे मांडण्याची संधी दिल्यानंतर, लादणे योग्य वाटेल अशा १.(एक हजार रूपयांहून अधिक नसेल इतक्या किंवा विहित करण्यात येईल इतक्या रकमेऐवढ्या, यांपैकी जी रक्कम अधिक असेल त्या रकमेऐवढ्या) दंडाच्या शिक्षेस पात्र ठरेल.
----------
१. सन २०१७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम २४ द्वारा एक हजार रूपयांहून अधिक नसणाऱ्या या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम३२९
#MLRCAct1966Marathisection329 #section329MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.